Top Recommended Stories

Aaj Cha Panchang, 30 April 2022: आजचे पंचाग, जाणून घ्या शनि अमावस्‍या काळातील शुभ मुहूर्त

Aaj cha Panchang, 30 April 2022: शक संवत: 1944 आणि विक्रम संवत: 2079 च्या चैत्र महिन्यातील कृष्‍ण पक्षातील आज शनि अमावस्या. अमावस्‍या काळातील शुभ मुहूर्त...

Published: April 30, 2022 9:19 AM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

aaj ka panchang, Ashtro News, Panchang, panchang 2022, panchang in hindi, Raviwar kapanchang, shubh muhurt, Shubh Muhurat today, Rahukal Today,

Aaj Ka Panchang, 30 April 2022: आज शनिवार. विशेष म्हणजे आज शनि अमावस्या. (Shani Amavasya) आजचा दिवस व्रत, पूजा, पाठ, ध्‍यान, साधना, दान करण्यासाठी फारच उत्तम आहे. शुभ मुहूर्तासाठी ब्रम्‍ह मुहूर्त, अभिजीत मुहूर्त, विजय महूर्त, गोधूळी मुहूर्त, अमृतकाळ, निशिता मुहूर्त आदी आहेत. या सर्व बाबींचा विचार करून तुम्ही आज महत्त्वाचे कार्य सुनिश्चित करू शकतात.

Also Read:

भारतीय वैदिक ज्‍योतिषानुसार, राहुकाळ, आडल योग, गुलिळ काळ, वर्ज्‍य, यमगंड, दुर्मुहूर्त आणि भद्रा आदी अशुभ योग मानले जातात. ते टाळण्यासाठी वेळ आणि काळ लक्षात घेऊन एखाद्याने त्यांची महत्त्वाची कामे निश्चित करायला हवीत. पाहिजेत.

You may like to read

30 एप्रिल 2022- आजचा पंचांग (Aaj che Panchang 30 April 2022)
तिथी: अमावस्‍या (दुपारी 01 वाजून 41 पर्यंत)
: प्रतिपदा

सूर्योदय-सूर्यास्त आणि चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ…

सूर्योदय : सकाळी 05 वाजून 41 मिनिटांला.
सूर्यास्त : सायंकाळी 06 वाजून 56 मिनिटांला.
चंद्रोदय : सायंकाळी 06 वाजून 34 मिनिटांला
चंद्रास्त : सकाळी 06 वाजता (1 मे)

आजचा वार : शनिवार
आजचा पक्ष : कृष्‍ण पक्ष
शक संवत: 1944
विक्रम संवत: 2079
गुजराती संवत: 2078

चंद्रमास: चैत्र-
: चैत्र- अमांत

नक्षत्र : अश्‍विनी- रात्री 08 वाजून 13 मिनिटांपर्यंत.
: भरिणी-

आजचे करण :

चतुष्‍पाद– दुपारी 01 वाजून 23 मिनिटांपर्यंत. (हा काळ अशुभ मानला जातो.)
: नाग- मध्यरात्री 01 वाजेपर्यत (या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाहीत.)
: किंस्‍तुघ्‍न (शुभ कार्य केली जात नाही.

आजचा योग: प्रति- दुपारी 03 वाजून 20 मिनिटांपर्यंत. (महत्त्वाचे कार्ये करू शकतात. उत्तम काळ)
: आयुष्‍मान (शुभ काळ मानला जाते.)

आजचे शुभ मुहूर्त (Aaj cha Shubh Muhurat)

ब्रम्‍ह मुहूर्त: पहाटे 04 वाजून 14 मिनिटांपासून पहाटे 04 वाजून 58 मिनिटांपर्यंत.
प्रात: संध्‍या: पहाटे 04 वाजून 37 मिनिटांपासून सकाळी 05 वाजून 41 मिनिटांपर्यंत.
अभिजीत मुहूर्त: सकाळी 11 वाजून 52 मिनिटांपासून दुपारी 12 वाजून 45 मिनिटांपर्यंत.
विजय महूर्त: दुपारी 02 वाजून 31 मिनिटांपासून ते दुपारी 03 वाजून 24 मिनिटांपर्यंत.
गोधूळी मुहूर्त: सायंकाळी 06 वाजून 42 मिनिटांपासून ते सायंकाळी 07 वाजून 06 मिनिटांपर्यंत.
अमृतकाळ : दुपारी 12 वाजून 42 मिनिटांपासून ते सायंकाळी 07 वाजून 06 मिनिटांपर्यंत.
निशिता मुहूर्त: रात्री 11 वाजून 57 मिनिटांपासून ते मध्यरात्री 12 वाजून 40 मिनिटांपर्यंत. (1 मे)

आजचे अशुभ योग

राहुकाळ: रात्री 09 वाजेपासून ते रात्री 10 वाजून 39 मिनिटांपर्यंत.
यमगंड: दुपारी 01 वाजून 58 मिनिटांपासून ते दुपारी 03 वाजून 37 मिनिटांपर्यंत.
आडल योग : सकाळी 05 वाजून 41 मिनिटांपासून ते रात्री 08 वाजून 13 मिनिटांपर्यंत.
गुलिळ काळ: सायंकाळी 05 वाजून 41 मिनिटांपासून ते 07 वाजून 21 मिनिटांपर्यंत.
वर्ज्‍य: दुपारी 03 वाजून 58 मिनिटांपासून ते सायंकाळी 05 वाजून 40 मिनिटांपर्यंत.
दुर्मुहूर्त: सकाळी 05 वाजून 41 मिनिटांपासून ते 06 वाजून 34 मिनिटांपर्यंत.
दिशाशूल: पूर्व

(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. india.com याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: April 30, 2022 9:19 AM IST