मुंबई: सर्वांना माहित आहे की अंडी (eggs) आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. अंड्यांमध्ये कॅल्शियम आणि प्रथिने आढळतात जे शरीरासाठी खूप उपयुक्त (Ande Khanyache Fayde) ठरतात. अंडी केवळ वजन कमी करण्यासाठी आणि वाढवण्यासाठीच उपयोगी नाही तर त्यामुळे दृष्टी देखील सुधारते. परंतु तुम्हाला हे माहित आहे का की फायद्यांबरोबरच अंडी तुम्हाला हानी (Ande Khanyache Nuksan) देखील पोहोचवू शकतात. आज आम्ही तुम्हाला अंड्यांच्या नुकसानाविषयी सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात अंड्यांमध्ये काय नुकसान (Disadvantages of egg) होऊ शकते. (Ande Khanyache Nuksan: Are You Eat Boiled Eggs?; Know the damage it causes, stay away from it now)Also Read - Protein Deficiency Symptoms: ही लक्षणे दर्शवतात शरीरातील प्रोटीनची कमतरता; अशा प्रकारे करा दूर

एका रिपोर्टनुसार उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयाशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांनी अंड्याचा पिवळा भाग खाऊ नये. अंड्याच्या जर्दीमध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे ते हृदयाला हानी पोहोचवू शकते.

याशिवाय अनेकांना उकडलेले अंडे खायला आवडतात. परंतु हे लक्षात ठेवा की उकडलेल्या अंड्यांपासून आपल्या शरीराला आवश्यक ते सर्व पोषक घटक मिळत नाहीत.

अंडी खाताना या गोष्टींची घ्या विशेष काळजी

अंडी खाताना लक्षात ठेवा की ते चांगले शिजलेले असावे. अर्धी शिजवलेली अंडी देखील तुम्हाला हानी पोहोचवू शकते.

मधुमेहाच्या रुग्णांनी अंड्याचा पिवळा भाग अजिबात खाऊ नये. याशिवाय अंड्याला स्पर्श करण्यापूर्वी आपले हात पूर्णपणे स्वच्छ करावे.