मुंबई : शरीरात रक्ताची कमतरता असल्यास अनेक प्रकारचे लक्षणे दिसू लागतात. ही लक्षणे थकवा येण्यापासून ते बेशुद्ध पडण्यापर्यंत काहीही असू शकतात. जर योग्य वेळी ही लक्षणे ओळखली तर समस्या गंभीर होत नाही. थकवा जाणवणे, चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे असे लक्षणे जर तुमच्या आढळून येत असतील तर तो अ‍ॅनिमिया आजार असून शकतो.

प्रथम अ‍ॅनिमिया कधी होतो ते समजून घ्यावे लागेल. तज्ञांच्या मते जेव्हा शरीराच्या रक्तातील लाल रक्तपेशी किंवा पेशी नष्ट होण्याचे प्रमाण हे त्यांच्या निर्मितीच्या प्रमाणापेक्षा अधिक असते तेव्हा हा आजार होतो. शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता झाल्याने टिशू आणि मांसपेशी यांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडतो. त्यामुळे शरीर थकत जाते याला अ‍ॅनिमिया म्हणतात.

पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अ‍ॅनिमिया प्रकरणे जास्त आढळून आली आहेत. अ‍ॅनिमिया हा भारतीय महिला आणि मुलांमध्ये सर्वाधिक आढळणाऱ्या आजारांपैकी एक आजार आहे. सुमारे 50 टक्के स्त्रिया आणि मुले या विकाराने त्रस्त आहेत. जर गर्भधारणेदरम्यान अॅनेमिया झाला तर प्रसूती दरम्यान मृत्यूचा धोका अनेक पटीने वाढतो. (these foods should be consumed in Anemia)

अ‍ॅनिमियाची लक्षणे (Anemia Symptoms)

 • अशक्तपणा, थकवा जाणवणे
 • हृदयाचे ठोके असामान्य असणे
 • श्वास घेण्यात अडचण होणे
 • डोकेदुखी होणे आणि या ही समस्या वाढत जाणे
 • खूप चक्कर येणे
 • त्वचा पिवळी होणे
 • त्वचा पांढरे होणे
 • जीभ, नखाच्या आतील भाग पांढरा दिसणे
 • चेहरा किंवा पायांवर सूज येणे

अ‍ॅनिमिया झाल्यास काय खावे? (these foods should be consumed in Anemia)

 • अ‍ॅनिमिया झाल्यास मनुके खा. मनुके दुधात उकळवा आणि हे दूध प्या.
 • पालकाचे सेवन करा. यात लोह असते. त्याचे सेवन केल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते.
 • केळी खा. त्यामध्ये पोटॅशियम असते. केळी दुधासोबत देखील खाऊ शकता.
 • सफरचंदचे सेवन खूप फायदेशीर असते.
 • हिरव्या पालेभाज्या, टोफू, रताळे खावे.
 • अंडी, दूध, चीज, मांस, मासे, सोयाबीन, तांदूळ यांचं सेवन करा.
 • दाळ, मटार, शेंगदाणे खा.
 • कॉफी आणि चहाचे सेवन अजिबात करू नका.