आज, 27 जुलै अंगारकी संकष्टी चतुर्थी. ही चतुर्थी मंगळवारी येत असल्यानं तिला अंगारकी चतुर्थी असं संबोधलं जातं. संकष्टी चतुर्थी म्हणजे संकट दूर करणारी चतुर्थी. या दिवशी भक्त श्रीगणेशाची विधीवत पूजन करतात. व्रत करतात. मनोभावे व्रत केल्यास भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसेच त्या आयुष्यातील सर्व संकटं, दु:ख दूर होतात.Also Read - Guruvar Che Upay: यशस्वी होण्यासाठी गुरुवारी नक्की करा हे उपाय, नशिबाची मिळेल साथ

प्रत्येक महिन्याला पौर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी तर अमावस्येनंतर येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असं म्हटलं जातं. एका महिन्यांत दोनदा चतुर्थी व्रत केलं जातं. Also Read - Samudrika Shastra: पोटाच्या आकारावरून ओळखा महिलेचा स्वभाव, या स्त्रिया गाजवतात वर्चस्व

अंगारकी संकष्टी चतुर्थी शुभ मुहूर्त-

संकष्टी चतुर्थी मंगळवारी, 27 जुलैला दुपारी 3 वाजून 54 मिनिटांला प्रारंभ होत आहे. 28 जुलैला दुपारी 2 वाजून 16 मिनिटांला समाप्त होत आहे. विशेष म्हणजे आज संकष्टी चतुर्थी आणि मंगळागौरी व्रत एकाच दिवशी आहे. Also Read - Sankashti Chaturthi July 2022: गणपतीला सर्व देवांमध्ये प्रथम पूजेचा मान, जाणून घ्या संकष्टी चतुर्थी व्रताचे मुहूर्त आणि चंद्रोदय वेळ

चंद्रोदय – 27 जुलै- 9:50 PM
चंद्रास्त – 28 जुलै- 9:40 AM

संकष्टी चतुर्थीचं महत्व-

हिंदु पंचागानुसार, संकष्टी चतुर्थीला श्रीगणेशच पूजा केल्याने भक्ताची सर्व दु:ख दूर होतात. श्रीगणेशला विघ्नहर्ता असं संबोधलं जाते. आपल्या आयुष्यातील सर्व विघ्ने ते दूर करतात. संकष्टी चतुर्थीला चंद्र दर्शन करणे शुभ असतं. चंद्राला अर्ध्य द्यावे. त्यानंतर चतुर्थीचं व्रत पूर्ण झालं, असं मानलं जातं.

संकष्टी चतुर्थी पूजा विधी-

1. पहाटे लवकर उठावे. स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे.
2. या दिवशी लाल वस्त्र परिधान करून गणेशपूजा करणं शुभ मानलं जातं.
3. पूजा करताना आपलं मुख उत्तर किंवा पूर्व दिशेला असावं.
4. चौरंगावर स्वच्छ वस्त्रावर गणेश मूर्ती किंवा प्रतिमा ठेवावी.
5. श्रीगणेशाची धूप-दीपानं पूजा करावी.
6. पूजा करताना ‘ॐ गणेशाय नमः’ किंवा ‘ॐ गं गणपते नमः’ मंत्रांचा जप करावा.
7. पूजेनंतर श्रीगणेशाला तीळाचे लाडू, मोदक किंवा मिठाईचा नैवेद्य द्यावा.
8. सायंकाळी चंदाला अर्ध्य देऊन उपवास सोडावा.
9. व्रत पूर्ण झाल्यानंतर आपल्या यथाशक्तीनुसार दान करावे.

आजचा अशुभ मुहूर्त-

राहु काल- दुपारी 3 वाजेपासून 4 वाजून 30 मिनिटांपर्यंत.
यमगंड- सकाळी 9 वाजेपासून 10 वाजून 30 मिनिटांपर्यंत.
गुलिक काल- दुपारी 12 वाजेपासून 1 वाजून 30 मिनिटांपर्यंत.
दुर्मुहूर्त काल- सकाळी 8 वाजून 23 म‍िनिटांपासून 9 वाजून 17 म‍िनिटांपर्यंत, रात्री 11 वाजून 25 म‍िनिटे ते 28 जुलैला दुपारी 12 वाजून 7 मिनिटं.

अशुभ मुहूर्तावर श्रीगणेश पूजन करू नये. तसेच श्रीगणेशाला तूळशीची पानं अर्पण करू नये. असं केल्यानं ते आपल्या भक्तावर नाराज होतात. सकंष्टी चतुर्थीला कंद-मूळ आणि जमिनीत येणारे फळं, पदार्थ खाऊ नये.