Top Recommended Stories

Ankle Pain: घोटे दुखीच्या समस्येने आहात त्रस्त, मग स्वयंपाकघरातील या गोष्टी येतील उपयोगी!

Ankle Pain: घरगुती उपाय आहेत ज्याचा वापर करून घोट्याच्या वेदना दूर केल्या जाऊ शकतात. आज आपण जाणून घेणार आहोत की घोट्याच्या दुखण्यासाठी घरगुती उपाय कोणते आहेत...

Updated: February 28, 2022 7:55 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Ankle Pain
Ankle Pain

Ankle Pain : अनेकदा बऱ्याच लोकांना घोट्याच्या दुखण्याला (Ankle Pain) सामोरे जावे लागते. ही वेदना स्नायूंचा ताण, सूज, मोच किंवा संधिवाताची समस्या असू शकते. अशा वेदनांवर वेळेत उपचार करणे खूप गरजेचे आहे. अन्यथा या दुखण्यामुळे (Ankle Pain Causes) व्यक्तीच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होऊ शकतो. आपल्या आजूबाजूला असे काही घरगुती उपाय (Home Remedies for Ankle Pain) आहेत ज्याचा वापर करून घोट्याच्या वेदना दूर केल्या जाऊ शकतात. आज आपण जाणून घेणार आहोत की घोट्याच्या दुखण्यासाठी घरगुती उपाय कोणते आहेत आणि हे उपाय कसे करायचे.

Also Read:

घोट्याच्या दुखण्यावर उपाय –

घोट्याच्या दुखण्यापासून सुटका मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. हे घरगुती उपाय पुढीलप्रमाणे –

You may like to read

– हळदीच्या (turmeric) सेवनाने घोट्याच्या दुखण्यापासून आराम मिळतो. अशा परिस्थितीत हळद आणि ऑलिव्ह ऑइलचे (turmeric and olive oil) मिश्रण प्रभावित भागावर लावा. असे केल्याने समस्या दूर होऊ शकते.

– घोट्याच्या दुखण्यावर लसणाच्या (garlic) सेवनाने आराम मिळतो. अशा स्थितीत खोबरेल तेलात लसूण शिजवून (cook garlic in coconut oil) तयार केलेले तेल प्रभावित भागावर लावावे. असे केल्याने घोट्याचे दुखणे दूर होऊ शकते.

– घोट्याच्या दुखण्यावरही मोहरीच्या तेलाची (mustard oil) मसाज उपयुक्त आहे. अशा स्थितीत मोहरीचे तेल थोडे कोमट करून प्रभावित भागावर मसाज करा. असे केल्याने समस्या दूर होऊ शकते.

– घोट्याच्या दुखण्यावर फक्त बर्फ ( applying ice) लावून आराम मिळत नाही. तर जळजळ देखील दूर होऊ शकते. पण थेट बर्फ वापरू नका हे लक्षात ठेवा. कापडात गुंडाळा बर्फाचा वापर करा.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या