By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
April 2022 Horoscope: एप्रिलमध्ये 'या' राशीच्या लोकांवर होईल लक्ष्मीची विशेष कृपा, नोकरीमध्ये प्रमोशनचेही प्रबळ योग
ग्रह आणि नक्षत्रांच्या दृष्टीने एप्रिल महिना (April 2022) खास असणार आहे. या महिन्यात अनेक ग्रहांच्या राशींमध्ये बदल होणार (Rashifal in Marathi) आहेत. ग्रहांच्या राशी बदलाचा प्रभाव जवळपास सर्वच राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे.

April 2022 Horoscope: ग्रह आणि नक्षत्रांच्या दृष्टीने एप्रिल महिना (April 2022) खास असणार आहे. या महिन्यात अनेक ग्रहांच्या राशींमध्ये बदल होणार (Rashifal in Marathi) आहेत. ग्रहांच्या राशी बदलाचा प्रभाव जवळपास सर्वच राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. ग्रहांच्या स्थितीमुळे काही राशीच्या लोकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते, तर काही राशींचे लोक प्रत्येक समस्येवर मात करू शकतात. चला तर मग जाणून घ्या, एप्रिलमध्ये कोण-कोणत्या राशींवर होणार ग्रह बदलाचा जबरदस्त लाभ…
एप्रिल 2022 मध्ये होणार या ग्रहांचे राशी परिवर्तन…
7 एप्रिल 2022 रोजी मंगळ ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 08 एप्रिलला बुध ग्रह मेष राशीत प्रवेश करेल. 12 एप्रिल रोजी राहू-केतू राशी बदलतील. राहू मेष राशीत तर केतू तूळ राशीत प्रवेश करेल.
13 एप्रिल रोजी गुरुदेव बृहस्पति मीन राशीत प्रवेश करेल. 14 एप्रिल रोजी सूर्य ग्रह मेष राशीत प्रवेश करेल. 25 एप्रिल रोजी बुध वृषभ राशीत प्रवेश करेल. 27 एप्रिलला शुक्र मीन राशीत प्रवेश करेल तर 29 एप्रिल रोजी शनी कुंभ राशीत प्रवेश करेल.
Trending Now
या राशीच्या लोकांना होईल जबरदस्त लाभ…
मिथुन: (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिना लाभदायक ठरणार आहे. यावेळी तुमच्या राशीवर शनिचा प्रभाव निर्माण झाला आहे. शनीच्या राशी बदलाने तुम्हाला शनिच्या साडेसातीपासून मुक्ती मिळेल. तुमची प्रलंबित कामे या महिन्यात पूर्ण होतील. शुभ समाचार समजतील. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील. उत्पन्नाचे नवे स्रोत सापडतील.
कन्या: (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांसाठी जागा बदलणे शक्य होईल. ऑफिसमध्ये प्रतिष्ठा मिळेल. उत्पन्नाचे नवे स्रोत वाढतील. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रगतीची संधी मिळेल. यावेळी तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता. घरासाठ कोणतीही महत्त्वाची वस्तू खरेदी करू शकता.
मकर: (Capricorn Horoscope)
मकर राशीत शनिदेव विराजमान आहेत. 29 एप्रिलला शनि ग्रह कुंभ राशीत प्रवेश करेल. मालमत्तेच्या बाबतीत शनीचे राशी बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. भाग्यवृद्धी होईल. या काळात तुम्हाला नवीन संधीचा लाभ मिळेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या