Makar Sankranti 2022: मकर संक्रातीनंतर मेषसह या 4 राशीच्या लोकांचे येणार अच्छे दिन! मंगळाची होईल कृपा

मेष राशीच्या लोकांना मंगळ ग्रहाचा राशी प्रवेश एक वरदानच ठरणार आहे. मेष राशीवर मंगळाचे आधिपत्य आहे. मंगळ गोचरच्या प्रभावामुळे धन, पद आणि प्रतिष्ठेत वाढ होऊ शकते. मंगळ गोचर काळात मंगळदेवाची पूर्ण कृपा राहील

Updated: January 12, 2022 1:50 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Makar Sankranti 2022: मकर संक्रातीनंतर मेषसह या 4 राशीच्या लोकांचे येणार अच्छे दिन! मंगळाची होईल कृपा

एखाद्या ग्रहाचा राशीत प्रवेश होतो तेव्हा काही राशींवर शुभ तर काही राशींवर अशुभ प्रभाव पडतो. सन 2022 मध्ये (Astrology 2022) अनेक ग्रह राशीत प्रवेश करणार आहेत. मकर संक्रातीनंतर (Makar Sankranti 2022) म्हणजे 16 जानेवारीला मंगळ ग्रह (Mangal Grah) धनु राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ (Mars) ग्रहाच्या परिवर्तनाचा प्रभाव मेष राशीपासून (Aries Horoscope) मीन राशीपर्यंत (Pisces Horoscope) पडणार आहे. मंगळ ग्रहाचा धनु राशीत प्रवेश केल्याने बहुतांश लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल जाणवेल. मंगळ देवाचा (mangaldev) कृपाशीर्वाद मिळाल्याने धनु राशीच्या (Sagittarius Horoscope) लोकांना धनलाभ होण्याची शक्यता आहे.

Also Read:

चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राशीवर शुभ आणि कोणत्या राशीवर अशुभ प्रभाव पडणार..

मेष (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांना मंगळ ग्रहाचा राशी प्रवेश एक वरदानच ठरणार आहे. मेष राशीवर मंगळाचे आधिपत्य आहे. मंगळ गोचरच्या प्रभावामुळे धन, पद आणि प्रतिष्ठेत वाढ होऊ शकते. मंगळ गोचर काळात मंगळदेवाची पूर्ण कृपा राहील. या काळात करियर आणि उद्योग-व्यवसायात लाभ होऊ शकतात.

मिथुन (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी देखील मंगळ ग्रहाचे राशीत परिवर्तन शुभ ठरणार आहे. 16 जानेवारीनंतर तुम्हाला धनलाभाचा योग आहे. उद्योग किंवा नोकरीत यश मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबीक जीवन आनंदी राहील. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. या काळात नवा व्यवसाय सुरू करू शकतात.

कन्या (Virgo Horoscope)

मंगळग्रहाच्या राशी परिवर्तनाच्या प्रभावामुळे कन्या राशीच्या लोकांची आर्थिक भरभराटी होणार आहे. नोकरीच्या नव्या संधी मिळतील. वैवाहिक जीवनात आणखी आनंद मिळेल. भाऊ-बहिणीचे सहकार्य मिळेल. अचानक धन लाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्व कामे मार्गी लागतील.

मीन (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी मंगळ ग्रहाचे राशीत परिवर्तन शुभ ठरणार आहे. कार्यक्षेत्रात प्रगती साधाल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी शुभ काळ आहे. आर्थिक समस्येतून सुटका होईल. परिश्रमाचे फळ मिळेल.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 11, 2022 4:20 PM IST

Updated Date: January 12, 2022 1:50 PM IST