Top Recommended Stories

Astrology Tips: आर्थिक अडचणीत असणाऱ्यांनी राशीनुसार जवळ ठेवा या वस्तू, लवकरच होईल धनप्राप्ती!

Astrology Tips: ज्योतिष शास्त्रात सांगितलेले उपाय या समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. यावर विश्वास ठेवून अनेक जण ज्योतिष शास्त्रानुसार सांगितलेल्या गोष्टींचे पालन करतात.

Published: January 28, 2022 4:42 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Vedic Astrology Rahu astrology sitting in this house of horoscope will make you rich marry your wife again see amazing facts
Why is Rahu powerful

Astrology Tips: ज्योतिष शास्त्रावर (Jyotish Shastra) अनेक जण विश्वास ठेवतात. ज्योतिष शास्त्रानुसार सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी त्या फॉलो सुद्धा करतात. ज्योतिष शास्त्रामध्ये प्रत्येक समस्येवर उपाय सांगण्यात आले आहेत. यानुसार आरोग्य (Health), नातेसंबंध (Relationships), करिअर (Career), आर्थिक स्थिती (Financial Status), कौटुंबिक स्थिती (Family Status) यासारख्या अनेक समस्यांचा यामध्ये सावेश होतो. ज्योतिष शास्त्रात सांगितलेले उपाय या समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. यावर विश्वास ठेवून अनेक जण ज्योतिष शास्त्रानुसार सांगितलेल्या गोष्टींचे पालन करतात. प्रत्येक राशीनुसार (zodiac) हे उपाय सुद्धा वेगवेगळे असतात.

Also Read:

आज आपण आर्थित अडचणीत (financial difficulties) असलेल्यांसाठी काही उपाय सांगणार आहोत. हा उपाय अतिशय सोपा आहे. कारण ज्या व्यक्ती आर्थित अडचणीत आहेत त्यांनी आपल्या राशीनुसार सांगितलेली वस्तू कायम आपल्यासोबत ठेवायची आहे. ती वस्तू जर त्या व्यक्तीने सोबत ठेवली तर लवकरच त्यांनी आर्थिक समस्या दूर होऊन धनप्राप्ती होऊ शकते.

You may like to read

आर्थिक अडचणीत असलेल्या व्यक्तींना ज्या वस्तू स्वत:जवळ ठेवण्याबद्दल आम्ही सांगणार आहोत त्या वस्तू त्या व्यक्तीला त्यांच्या घरामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी ठेवाव्या लागतील. या व्यक्तीने ही गोष्ट कायम लक्षात ठेवावी की या वस्तूंची स्थापना करण्याआधी त्यांना गंगाजलने (Gangajal) शुद्ध करावे. या वस्तू नेहमी स्वच्छ ठेवाव्या. त्याचप्रमाणे या वस्तू ठेवण्याची जागा सतत बदलू नये. एक ते दोन वर्षांनंतर या वस्तूंची जागा बदलावी.

मेष –

मेष राशीच्या लोकांनी स्वतः जवळ तांब्याचा सूर्य (Copper sun) ठेवल्याने त्यांना धनलाभ होऊ शकतो.

वृषभ –

वृषभ राशीच्या लोकांनी स्वतःकडे पांढऱ्या रंगाचा शंख (White conch) ठेवावा. असे केल्यामुळे त्यांची आर्थिक संकटातून सुटका होऊ शकते.

मिथुन –

मिथुन राशीच्या व्यक्तींनी हिरव्या रंगाची गणपतीची मूर्ती (green Colour idol of Lord Ganesha ) ठेवल्याने त्यांना भरपूर धनप्राप्ती होऊ शकते.

कर्क –

कर्क राशीच्या लोकांनी पांढऱ्या रंगाचा क्रिस्टल बॉल (White Colour crystal ball) जवळ ठेवणे फायदा होईल.

सिंह –

सिंह राशीच्या लोकांनी तांब्याचे नाणे (Copper coin) लाल कपड्यात बांधून स्वत:जवळ ठेवावे. यातून त्यांना धनलाभ होऊ शकतो.

कन्या –

कन्या राशीच्या लोकांनी त्यांच्या प्रमुख देवतेची पितळेची मूर्ती (Brass idol of the chief deity) स्वत:जवळ ठेवावी. यामुळे धनप्राप्ती होण्यास मदत होईल.

तूळ –

तूळ राशीच्या लोकांनी श्रीयंत्र (Shriyantra) जवळ ठेवावे. यामुळे त्यांना धनलाभ होऊ शकतो.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.