Top Recommended Stories

BA.2 Variant: ऑमिक्रॉननंतर आता 'या' व्हेरिएंटने वाढवली चिंता; जाणून घ्या लक्षणे...

BA.2 Variant: कोरोनामुळे सर्वत्र भयावह (Corona Pandemic) परिस्थिती निर्माण झाली होती. गेल्या दोन वर्षांपासून सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचे वाटत आहे. असे असताना जगातील काही भागात आता कोरोनाने (Covid-19) पुन्हा डोकेवर काढले आहे.

Updated: March 24, 2022 5:42 PM IST

By Vikas Chavhan | Edited by Vikas Chavhan

BA.2 Variant: ऑमिक्रॉननंतर आता 'या' व्हेरिएंटने वाढवली चिंता; जाणून घ्या लक्षणे...

BA.2 Variant: कोरोनामुळे सर्वत्र भयावह (Corona Pandemic) परिस्थिती निर्माण झाली होती. गेल्या दोन वर्षांपासून सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचे वाटत आहे. असे असताना जगातील काही भागात आता कोरोनाने (Covid-19) पुन्हा डोकेवर काढले आहे. ऑमिक्रॉननंतर (Omicron) आता ऑमिक्रॉन सब व्हेरिएंट BA.2 ने चिंता वाढवली आहे. या व्हेरिएंटमुळे पाश्चिमात्य देशात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ बघावयास मिळाली आहे. त्यानुसार जाणून घेऊया व्हेरिएंट आणि त्याच्या लक्षणांविषयी….

Also Read:

काय आहे BA.2 व्हेरिएंट?

– सॅन दिएगो स्थित जिनोमिक्स फार्म (Genomics Firm) हेलिक्स BA.2 व्हेरिएंटवर लक्ष ठेवून आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जानेवारीत पहिल्यांदा अमेरिकेत हा व्हेरिएंट दिसून आला. अमेरिकेतील कोरोनाच्या सर्व रुग्णांपैकी 70 टक्के रूग्ण हे BA.2 चे आहे.
– व्हाईट हाऊसचे मुख्य चिकित्सा अधिकारी डॉ. अँथनी फौसी यांनी सांगितले की, BA.2 हा व्हेरिएंट ऑमिक्रॉन पेक्षा 60 टक्के जास्त संक्रमित आहे. तरी हा जास्त गंभीर नाही असे त्यांनी म्हटले आहे.
– डॉ. अँथनी फौसी यांच्या मते वेळेवर लसीकरण आणि बूस्टर डोस घेतल्यास या व्हेरिएंटचा धोका कमी होते. या व्हेरिएंटमुळे चीन आणि युरोपातील काही भागात आधीपासूनच कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.
– काही शास्त्रज्ञांचे म्हणणे असे आहे की, BA.2 व्हेरिएंट पूर्वीच्या BA.2 व्हेरिएंट पेक्षा 30 टक्के अधिक संक्रमित असू शकतो. या व्हेरिएंटला स्टेल्थ ओमिक्रोन म्हटले जाते. कारण या व्हेरिएंटचा शोध घेणे कठीण आहे.
– जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) म्हणण्यानुसार BA.2 आपल्या अनुवांशिक अनुक्रमामधील BA.1 पेक्षा खूप वेगळा आहे. यांच्यात स्पाईक प्रोटीन आणि इतर प्रोटीनमध्ये अमिनो ऍसिडचा फरक समाविष्ट आहे. आकडेवारी लक्षात घेता BA.2 हा BA.1 पेक्षा अधिक संक्रमित आहे.
– WHO ने चेतावणी दिली आहे की, कोरोनाची वाढती रुग्णसंख्या ही फक्त चीन किंवा युरोपमध्येचा आहे असे नाही. तर BA.2 व्हेरिएंट आधीपासूनच अनेक देशामध्ये आहे.

You may like to read

हे आहे लक्षणे…

वैज्ञानिकांनी ओमिक्रोनच्या या स्ट्रेनशी निगडीत सामान्य लक्षणांची यादी बनवली आहे. त्याच्यानुसार AB.2 ची लागण झालेल्या रुग्णांमध्ये डोकेदुखी, घशात खवखव, वारंवार शिंक येणे , नाक वाहने, अंगदुखी हे लक्षण दिसून येतात. यासह US नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनने ओमिक्रोन BA.2 सब व्हेरियंटचे अजून दोन लक्षणे शोधली आहे. ज्यात चक्कर येणे आणि थकवा या लक्षणांचा समावेश आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.