Top Recommended Stories

कोणी खाऊ नये बदाम? जाणून घ्या बदाम खाण्याचे नुकसान- Badam Khanyache Nuksan

Badam Khanyache Nuksan : सुकामेवा आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. काजू, बदाम, मनुका, अक्रोड हे सर्व फळं अनेक प्रकारच्या पोषक घटकांनी समृद्ध असतात. मात्र आज आम्ही तुम्हाला बदाम कोणी खाऊन नये आणि तो खाल्ल्याने काय नुकसान होऊ शकते. याविषीय सांगणार आहोत.

Published: July 26, 2022 8:30 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

eat almonds in morning
सुबह बादाम खाने के फायदे

Badam Khanyache Nuksan : सुकामेवा म्हटले की डोळ्यासमोर काजू, बदाम, मनुका, अक्रोड इत्यादी फळांची नावं येतात. सुकामेवा आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. हे सर्व फळं अनेक प्रकारच्या पोषक घटकांनी समृद्ध असतात. मात्र आज आम्ही तुम्हाला सुकामेवापैकी एक असलेले बदामच्या सेवनामुळे होणाऱ्या हानिविषयी (Disadvantages Of Almonds) सांगणार आहोत. बदाम हे प्रोटीन्स, फॅट्स, व्हिटॅमिन्स आणि मिनिरल्स समृद्ध असतात. ते केवळ शरीराच्या विकासास मदत करत नाहीत तर शरीराला मजबूत बनवतात. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का की काही लोकांसाठी बदामाचे सेवन धोकादायक (eating almonds dangerous For this people) ठरू शकते. त्यामुळे अशा लोकांनी बदामाचे सेवन टाळायला (Who should not eat almonds) हवे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या लोकांनी बदामाचे सेवन करू नये…

बीपीच्या समस्येने पीडित लोक : जे लोक बीपी म्हणजेच रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त आहेत त्यांनी बदामाचे सेवन करू नये. हाय बीपीचे रुग्ण बीपीवर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधे देखील घेत असतात. त्यामुळे बदामाचे सेवन करणे त्यांच्या आरोग्यास हानिकारक (Disadvantages Of Eating Almonds) ठरू शकते.

You may like to read

किडनी स्टोन असलेले लोक : जे लोक किडनी स्टोन किंवा पत्ताशयातील स्टोनच्या समस्येमुळे त्रस्त आहेत, त्यांनी बदामाचे सेवन करणे टाळावे. बदामात असणार्‍या ऑक्सलेटमुळे त्यांना त्रास (almonds can be dangerous) होऊ शकतो.

पचनाच्या समस्येने त्रस्त लोक : जे लोक पचनासंबंधित समस्येने त्रस्त आहेत, त्यांनी बदामाचे सेवन करू नये. बदामांमध्ये प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे आपल्याला हे पचवण्यासाठी अधिक त्रास होऊ शकतो. याशिवाय ज्या लोकांना अॅसिडिटीचा त्रास आहे, त्यांनी देखील बदाम खाऊ नयेत. यामध्ये असलेल्या फायबरमुळे गॅसची समस्या (Badam khanyache tote) उद्भवू शकते.

वजन कमी करणारे लोक : आपण वजन कमी करत असाल, तरी देखील आपण बदामाचे सेवन करणे टाळावे. बदामात कॅलरी आणि फॅट्स अधिक प्रमाणात असतात. त्यामुळं बदामाचे अधिक प्रमाणात सेवन केल्याने तुमचे वजन कमी होण्याऐवजी लठ्ठपणा वाढू शकतो.

(डिस्केलमर: लेखात दिलेला सल्ला केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. कोणताही उपाय करून पाहण्याआधी तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. )

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.