मुंबई : बडीशेपचे (Badishep) सेवन मुखशुद्धी साठी केले जाते. बडीशेप तोंडातून येणारी दुर्गंधी दूर करते. परंतु, तुम्हाला हे माहित आहे की आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर मात करण्यासाठी देखील बडीशेपचा वापर करण्यात (Benefits OF Badishep) येतो. बडीशेप पुरुषांसाठी खूप फायदेशीर (Badishep benefits For Men) ठरते. यामध्ये कॉपर, पोटॅशियम, कॅल्शियम, झिंक, मॅंगनीज, व्हिटॅमिन सी, लोह, सेलेनियम आणि मॅग्नेशियम सारखे घटक असतात. बडीशेपच्या बियांमध्ये पोषक तत्त्व असतात त्यामुळं पुरुषांनी रात्रीच्या वेळी नक्की बडीशेपचं सेवन (men should consume fennel seeds at night) केले पाहिजे.Also Read - रिकाम्या पोटी बडीशेपचे पाणी पिण्याचे फायदे - Badishep che Pani Pinyache Fayde

पुरुषांसाठी बडीशेप कशी फायदेशीर?

बडीशेप पुरुषांमध्ये लैंगिक शक्ती वाढविण्यासाठी (Badishep Benefits For Men) कार्य करू शकते. बडीशेप पुरुषांची लैंगिक शक्ती वाढवण्याचे कम करते. एका संशोधनानुसार बडीशेप खाल्ल्याने पुरुषांची लैंगिक शक्ती दुप्पट होते. बडीशेप झिंक आणि फायबरने समृद्ध असते. त्यामुळे शीघ्र पतनची समस्या दूर होण्यास मदत होते.

कधी आणि कशी खावी बडीशेप

रात्री झोपेच्या आधी बडीशेप खाणे खूप फायदेशीर ठरते. यासाठी एका ग्लास दुधात एक चमचा बडीशेप पावडर घाला, चांगले मिसळा आणि प्या.

बडीशेप खाण्याचे इतर फायदे

  • मळमळ किंवा उलटीचा त्रास किंवा अपचनाचा त्रास होत असेल तर नियमित जेवणानंतर बडीशेपचं सेवन करावं. त्यामुळं पचनक्रिया व्यवस्थित काम करते आणि मळमळ होण्याच्या त्रासापासून आराम मिळतो.
  • जेवल्यानंतर बडीशेपचं सेवन केल्यास अन्न चांगलं पचन होतं. काळं मीठ, जीरे, बडीशेप एकत्र करून त्याचे चूर्ण कोमट पाण्यासोबत घ्यावं. यामुळं पचनक्रिया उत्तम होते. पचनासाठी हे उत्तम चूर्ण आहे.
  • बद्धकोष्टता आणि गॅसची समस्या असेल तर रात्री झोपण्यापूर्वी बडीशेप आणि साखर बारीक करून कोमट पाण्यासोबत सेवन करावं. त्यामुळं या त्रासापासून आराम मिळेल.
  • तुम्हाला जर खोकल्याचा त्रास जाणवत असेल तर बडीशेप आणि मध एकत्र करून त्याचे सेवन करावं. यामुळं खोकल्याच्या त्रासापासून आराम मिळेल.
  • शरीरातील रक्त शुद्ध करण्याचे काम देखील बडीशेप करते. त्वचेसाठी दररोज बडीशेप खाणे फायदेशीर ठरते.
  • तोंडाला दुर्गंधी येत असेल तर कायम जवळ बडीशेप ठेवावी. बडीशेप तोंडाची दुर्गंधी घालवण्यात मदत करते.
  • बडीशेप डोळांसाठी देखील अतिशय उपयुक्त असते. बडीशेप आणि पत्री खडीसाखर एकत्र करून सेवन केल्यास ते डोळ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरते.
  • पोटात दुखत असेल तर भाजलेली बडीशेप खावी. उन्हामुळे जळजळ होत असेल तर सरबत किंवा बडीशेप भिजवलेलं पाणी प्यावं.
  • वजन कमी करण्यासाठी देखील बडीशेप उपयुक्त आहे. नियमित सकाळी ग्लासभर बडीशेपाच्या पाण्यामध्ये मध मिसळून प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.