रिकाम्या पोटी बडीशेपचे पाणी पिण्याचे फायदे - Badishep che Pani Pinyache Fayde
Badishep che Pani Pinyache Fayde: आपल्या किचनमध्ये असलेले मसाले भाजी चवदार तर बनवतातच शिवाय आरोग्यासाठी देखील ते अनेक प्रकारे फायदेशीर असतात. आज आपण बडीशेपविषयी बोलत आहोत. बडीशेप स्वयंपाकात मसाला म्हणून वापरली जाते. परंतु घरगुती उपचारासाठी देखील बडीशेपचा वापर केला जातो.

Badishep che Pani Pinyache Fayde: आपल्या किचनमध्ये असलेले मसाले भाजी चवदार तर बनवतातच शिवाय आरोग्यासाठी देखील ते अनेक प्रकारे फायदेशीर असतात. आज आपण बडीशेपविषयी (fennel seeds) बोलत आहोत. बडीशेप स्वयंपाकात मसाला म्हणून वापरली जाते. परंतु घरगुती उपचारासाठी (Home Remedies) देखील बडीशेपचा वापर केला जातो. पोटाची उष्णता कमी करण्यासोबतच बडीशेपचे पाणी आरोग्याच्या अनेक समस्यांवर मात करू शकते. आज या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला रिकाम्या पोटी बडीशेपचे पाणी (fennel seeds water) पिल्यास आरोग्याला काय फायदे होऊ शकतात याबाबत सांगणार आहोत. रिकाम्या पोटी बडीशेपचे पाणी पिण्याचे फायदे (Benefits of fennel water) जाणून घेऊया पोषणतज्ञ आणि वेलनेस तज्ज्ञ वरुण कात्याल यांच्याकडून…
Also Read:
बडीशेपचे पाणी पिण्याचे फायदे (Benefits of fennel water)
रिकाम्या पोटी एका बडीशेपच्या पाण्याचे सेवन केले तर ते वजन कमी करण्यास मदत करते, शिवाय यामुळे लठ्ठपणा देखील नियंत्रित ठेवता येऊ शकतो. त्यामुळे रिकाम्या पोटी बडीशेपच्या पाण्याचे सेवन करावे.
डोळ्यांची कमजोरी दूर करण्यासाठी बडीशेपचे पाणी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. बडीशेपमध्ये व्हिटॅमिन ए सोबतच अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील आढळतात. यामुळे डोळ्यांची कमजोरी तर दूर होतेच शिवाय डोळ्यांची सूज आणि जळजळ यापासून देखील आराम मिळतो. त्यामुळे बडीशेपचे पाणी रोज प्यावे.
त्वचेची समस्या दूर करण्यासाठी देखील बडीशेपचे पाणी खूप उपयुक्त ठरू शकते. यासाठी बडीशेपचे पाणी नियमित प्यावे. बडीशेपमध्ये व्हिटॅमिन सी आढळते यामुळे त्वचा तर चमकदार बनतेच शिवाय त्वचेवरील डाग आणि इतर समस्यांपासून देखील आराम मिळतो. त्यामुळे नियमित बडीशेपचे पाणी प्यावे.
(टीप – या लेखात नमूद केलेल्या मुद्द्यांवरून असे लक्षात येते की बडीशेपचे पाणी आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त ठरू शकते. परंतु कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हानीकारक असू शकतो. त्यामुळे त्याचे जास्त सेवन करणे टाळावे.तसेच कोणताही उपाय करुन पाहण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.)
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या