Beetroot For Skin : आरोग्यासोबतच त्वचेसाठीही अत्यंत उपयुक्त आहे बीट, या सर्व समस्या होतील दूर

हिवाळ्यात लोक मोठ्या प्रमाणात बीटचा जूस पितात. बीटरूट आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये लोह, व्हिटॅमिन बी6, मॅग्नेशियम, फोलेट, पोटॅशियम, फायबर, अँटीऑक्सिडंट्स यांसारखे पोषक घटक आढळतात.

Published: January 9, 2022 7:18 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Beetroot For Skin : आरोग्यासोबतच त्वचेसाठीही अत्यंत उपयुक्त आहे बीट, या सर्व समस्या होतील दूर
Beetroot For Skin Beetroot is extremely useful for skin as well as health, all these problems will go away

Beetroot For Skin: हिवाळ्यात लोक मोठ्या प्रमाणात बीटचा जूस (Beetroot Juice) पितात. बीटरूट आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये लोह, व्हिटॅमिन बी6, मॅग्नेशियम, फोलेट, पोटॅशियम, फायबर, अँटीऑक्सिडंट्स यांसारखे पोषक घटक आढळतात. पण तुम्हाला हे माहिती आहे का की आरोग्यासोबतच बीटरूट तुमच्या त्वचेसाठीही (Beetroot useful For Skin) खूप चांगले मानले जाते. त्वचेवर बीट वापरण्याचे अनेक फायदे आहेत. चला जाणून घेऊया त्या फायद्यांविषयी…

Also Read:

त्वचा डिटॉक्स करते (Detoxifies the skin) : बीटचा रस त्वचेला डिटॉक्स करण्याचे काम करतो. यामुळे त्वचेवरील छिद्र साफ होते आणि त्वचा चमकदार बनते.

अँटी-एजिंग (Anti-aging) : बीटरूटमध्ये अल्फा-लिपोइक अॅसिड असते. ते एक प्रकारचे अँटीऑक्सिडेंट आहे. यामुळे त्वचेतील कोलेजनची पातळी वाढवते आणि तुम्हाला एजिंगच्या समस्येपासून संरक्षण मिळते.

काळी वर्तुळे कमी करते (Reduces dark circles) : तुम्हाला काळी वर्तुळे (Dark circles) असतील तर बीटचा जूस तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. हा रस रोज डोळ्यांखाली लावल्याने डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत होते.

गुलाबी ओठ (Pink lips) : तुमचे ओठ डार्क असतील तर तुम्ही बीटरूटचा वापर करू शकता. यासाठी तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी बीटरूटचा रस ओठांवर लावा. असे रोज केल्याने तुम्हाला फरक दिसेल. ओठ गुलाबी होण्यास मदत होईल.

मृत त्वचा काढून टाकते (Removes dead skin) : बीटरूट त्वचेला हायड्रेटेड आणि मॉइश्चराइज ठेवते. तसेच मृत त्वचा काढून टाकण्यास यामुळे मदत होते. यासाठी नियमितपणे बीटरूटचा रस त्वचेवर लावा.

(डिस्क्लेमर : लेखात दिलला मजकूर ही सामान्य माहिती आहे. हे तज्ज्ञांचे मत नाही)

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 9, 2022 7:18 PM IST