Benefits of Amla Powder: या 4 प्रकारे करा आवळा पावडरचा उपयोग; केस होतील काळेशार
Benefits of Amla Powder: चुकीचा आहार आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे अवेळी केस पांढरे होण्याची समस्या उद्भवू शकते. अशा वेळी नैसर्गिकरित्या केस काळे करण्यासाठी आवळा पावडर अतिशय उपयुक्त ठरू शकते. आवळ्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ईसारखे गुणधर्म असतात.

Benefits of Amla Powder: चुकीचा आहार आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे अवेळी केस पांढरे होण्याची समस्या उद्भवू शकते. अशा वेळी नैसर्गिकरित्या केस काळे करण्यासाठी आवळा पावडर (Amla Powder) अतिशय उपयुक्त ठरू शकते. आवळ्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स (Antioxidants) आणि व्हिटॅमिन ई (Vitamin C) सारखे गुणधर्म असतात. त्यामुळे केसांना अनेक प्रकारे फायदा होतो. केसांच्या चांगल्या वाढीसाठी आणि कोंडामुक्त (Dandruff) केसांसाठी आवळा पावडर खूप फायदेशीर ठरते. जाणून घेऊया पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी आवळा पावडरचा कशा पद्धतीने केला (Amla Powder Benefits) जाऊ शकतो वापर…
Also Read:
मेहंदी आणि आवळा पावडर
केस काळे करण्यासाठी आवळा पावडर आणि मेहंदीची पेस्ट (Mehndi and amla powder paste) अतिशय उपयुक्त ठरते. यासाठी पाणी थोड गरम करून घ्या आणि त्यात मेहंदी आणि आवळा पावडर मिक्स करून टाका. मेंदी आणि आवळ्याचा हा पॅक रात्री तयार करा आणि सकाळी केसांना लावा. यामुळं केसांना पोषण मिळते आणि काळे होतात.
शिककाई आणि रीठा पावडर (Shikkai and Reetha powder)
एका लोखंडाच्या कढईत शिकेकाई, रीठा पावडर (Shikkai, Reetha powder) आणि आवळा पावडर घ्या आणि हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्या. हे मिश्रण झाकण ठेवून रात्रभर तसेच ठेवा आणि दुसऱ्या दिवशी केसांना लावा. यानंतर तासभर तसेच ठेवा आणि एक तासानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवा. हा उपाय आठवड्यातून एकदा असे दोन महिने करा.
खोबरेल तेल (coconut oil)
एका वाटीत खोबरेल तेल घ्या. ही वाटी एका मोठ्या भांड्यात ठेवा आणि गरम करा. काही मिनिटांनी त्यात आवळा पावडर घाला. लक्षात ठेवा की तुम्हाला एक चमचा आवळा पावडर, 2 चमचे खोबरेल तेलात घालून मिक्स करावे लागेल. हे मिश्रण पूर्णपणे काळं होईपर्यंत गरम करा आणि यानंतर थंड होऊ द्या. काही वेळाने केसांना लावा आणि तासभर तसेच ठेवा. त्यानंतर साध्या पाण्याने केस स्वच्छ धुवा.
कोरफड आणि आवळा पावडर
कोरफडीची (Aloevera) ताजी पाने घ्या आणि त्यांची पेस्ट बनवा आणि आवळा पावडरमध्ये घाला. त्यावर गरम पाणी टाका आणि थोडा वेळ थंड होऊ द्या. थंड झाल्यावर ही पेस्ट केसांना लावा आणि 45 मिनिटे ठेवा. त्यानंतर केस साध्या पाण्याने स्वच्छ धुवा.