Benefits Of Curry Patta: सकाळी रिकाम्या पोटी खा कढीपत्ता, होतील आश्चर्यकारक फायदे!
Benefits Of Curry Patta: रिकाम्या पोटी कढीपत्त्याचे सेवन केले तर तुम्ही तुमच्या वजनावर नियंत्रण मिळवू शकता. त्याचसोबत पोटाशी संबंधित अनेक समस्यांपासून मुक्ती मिळवू शकते.

Benefits Of Curry Patta: कोणत्याही पदार्थाला कढीपत्त्याची (Curry Patta) फोडणी दिल्याशिवाय त्याला चव येत नाही. आपल्या स्वयंपाक घरामध्ये ज्याप्रमाणे जिरं, मोहरीची फोडणी दिली जाते तसंच कढीपत्त्याची (Curry Leaves) सुद्धो फोडणी दिली जाते. त्यामुळे जेवण जास्त स्वादिष्ट होते आणि चांगली चव येते. असे काही खाद्यपदार्थ आहेत जे कढीपत्त्याशिवाय तयार केल्यास ते चविष्ट होत नाही. जेवणाची चव वाढवणारी कढीपत्ता जसा महत्वाचा आहे तसंच तो आरोग्यासाठी (Beneficial For Health) देखील खूप महत्वाचा आहे. कढीपत्ता आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. जर सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्त्याचे सेवन केले तर तुम्ही तुमच्या वजनावर नियंत्रण मिळवू (Control Your Weight) शकता. त्याचसोबत पोटाशी संबंधित अनेक समस्यांपासून मुक्ती मिळवू शकते. कढीपत्त्यात भरपूर जीवनसत्त्वे असतात. यामध्ये व्हिटॅमिन ए (Vitamin A), व्हिटॅमिन बी (Vitamin B), व्हिटॅमिन सी (Vitamin C) आणि व्हिटॅमिन बी2 (Vitamin B2) असतात. त्यामुळे कढीपत्ता तुमची त्वचा, डोळे, रक्त इत्यादी निरोगी ठेवते. सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्ता खाण्याचे काय फायदे आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत….
Also Read:
कढीपत्ता वजन कमी करण्यास फायदेशीर (Curry Patta Benefit In Weight Loss)-
कढीपत्त्यात कार्बाझोल अल्कलॉइड्स नावाचा घटक असतो. ज्याचा उपयोग अनेक औषधे तयार करण्यासाठी केला जातो. हे वजन वाढू देत नाही आणि हळूहळू वाढलेले वजन कमी करते. ते कार्बाझोल अल्कलॉइड्स शरीरात कोलेस्ट्रॉल वाढू देत नाही त्यामुळे वजनही नियंत्रित राहते.
अतिसार आणि अपचनामध्ये कढीपत्ता फायदे (Benefits of Curry Patta in Diarrhea and Indigestion)-
सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्ता खाल्ल्याने पचनास मदत होते. जुलाब किंवा अपचन असेल तर कढीपत्ता औषधासारखे काम करतो. पोटात काही त्रास होत असेल तर ताकामध्ये कोरडी कढीपत्ताची पानं बारीक करून टाका. त्यामुळे ताकाची चव वाढेल, सोबतच जुलाब, बद्धकोष्ठता आणि लघवीच्या समस्येपासूनही सुटका मिळेल.
स्मरणशक्तीसाठी कढीपत्ता फायदेशीर (Curry Patta Benefits for Memory) –
कढीपत्ता खाल्ल्याने स्मृतीभ्रंश थांबतो असे अनेक अभ्यासातून समोर आले आहे. जर तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टी विसरत असाल किंवा आजकाल तुम्हाला काही नीट आठवत नाही असे वाटत असेल तर जेवणात कढीपत्ता वापरण्यास सुरूवात करा. हे स्मरणशक्तीचे विकार दूर करण्यात प्रभावी ठरते.
साखरेच्या रुग्णांसाठी कढीपत्ता फायदेशीर (Benefits Of Curry leaves for sugar patient)-
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, कढीपत्ता रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतो. हे स्वादुपिंडात इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशींचे संरक्षण करते. यामध्ये तांबे, लोह आणि झिंक सारखे घटक असतात त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी जर ते रोज सकाळी खाल्ले तर ते त्यांच्यासाठी वरदान ठरू शकते.
दृष्टीसाठी कढीपत्ता फायदेशीर (Curry Leaves Benefits for eyesight)-
कढीपत्त्यात व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे कढीपत्ता खाल्ल्याने डोळे तेजस्वी होतात. जर तुमच्या डोळ्यात हलका मोतीबिंदू सुरू झाला असेल तर त्याचे सेवन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
केसांच्या वाढीसाठी कढीपत्ता फायदेशीर (Benefits of Curry Patta for Hair Growth) –
कढीपत्त्यामुळे केसांचे रोमकेंद्र सुधारतात. यामुळे तुमची लांब आणि मजबूत केसांची इच्छा पूर्ण होऊ शकते. केस अवेळी पांढरे होणार नाहीत तसंच केस गळणार नाहीत.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या