मुंबई : आले आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त (Benefits Of Ginger) ठरते. आल्यामध्ये अनेक जीवनसत्त्वांबरोबरच मॅंगनीज आणि कॉपर आढळतात. शरीराच्या क्रिया सुरळीत चालण्यासाठी हे सर्व घटक खूप महत्वाची भूमिका (Benefits Of Eating Ginger) बजावतात. आलं हे अनेक गुणधर्मांची खाण आहे आणि त्याचा विविध प्रकारे वापर केला जाऊ शकतो. परंतु आल्याचा रस (Ginger juice) सर्वोत्तम पर्याय मानला जातो. चला तर जाणून घेऊया आल्याच्या रसाचे फायदे (Benefits of Ginger Juice). (Benefits Of Eating Ginger: Ginger is beneficial for health; Know 10 important benefits)

हे आहेत आल्याचे फायदे (Benefits of Ginger Juice)

  1. आल्याच्या रसामध्ये सूज कमी करण्याची शक्ती अधिक प्रमाणात असते. सांधेदुखीने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी आलं हे वरदान आहे. एका अभ्यासानुसार, जे लोक नियमितपणे आल्याचा रस सेवन करतात त्यांना सांध्येदुखी आणि सांध्यावरील सूज अशा त्रासापासून आराम मिळतो. आल्याच्या रसामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीरातील ताज्या रक्ताचा प्रवाह वाढवतात.
  2. आल्यामध्ये कर्करोगासारख्या भयंकर आजारांपासून शरीराचे रक्षण करण्याचे गुणधर्म असतात. आले कर्करोगास कारणीभूत ठरणाऱ्या पेशी नष्ट करण्याचे काम करते. एका संशोधनानुसार, स्तनाच्या कर्करोगास कारणीभूत पेशींच्या वाढीस प्रतिबंध घालण्यासाठी आले महत्त्वाची भूमिका निभावते.
  3. आल्यामध्ये रक्त पातळ करण्याची अनोखे गुणधर्म असतात. त्यामुळे रक्तदाब सारख्या आजारांमध्ये तत्काळ आराम मिळण्यासाठी आले उपयुक्त ठरते.
  4. तुम्हाला दातदुखीची समस्या असेल किंवा डोकेदुखी असल्यास आल्याचा रस खूप प्रभावी ठरतो. संशोधनानुसार मायग्रेनची समस्या टाळण्यासाठी आले अत्यंत उपयक्त ठरते.
  5. आले पचनाशी संबंधित समस्येवर देखील गुणकारी आहे. आल्याचा रस पोटातील अन्न हलवून बाहेरच्या दिशेने ढकलतो. आल्याचा हा चमत्कारी गुणधर्म पचन आणि गॅसच्या समस्येपासून देखील आराम देतो. तसेच सर्व प्रकारच्या पोटदुखीवरही आले गुणकरी ठरते.
  6. आल्याच्या रसामध्ये सांधेदुखी बरे करण्याची क्षमता असते. संधिवात आणि थायरॉईडग्रस्त रुग्णांसाठी आल्यातील दाहक-विरोधी गुणधर्म खूप फायदेशीर ठरतात.
  7. आल्याच्या रसाच्या नियमित वापराने कोलेस्टेरॉलची पातळी नेहमी कमी ठेवण्यास मदत होते. आले रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यास प्रतिबंध करते आणि रक्ताचा प्रवाह करते. यामुळे हृदयविकारापासून संरक्षण होते.
  8. सर्दी टाळण्यासाठी आले सर्वात प्रभावी मानले जाते. हे सर्दी निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियांना नष्ट करण्याचे काम करते. यामुळे तुमचे सर्दीपासून संरक्षण होते.
  9. तुम्हाला जाड आणि चमकदार केस हवे असतील तर आल्याच्या रसाचा नियमित वापर केल्यास तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. यासाठी तुम्ही आल्याच्या रसाचे सेवन करू शकता किंवा तो थेट टाळूवर देखील लावू शकता. मात्र डोक्यावर आल्याचा शुद्ध रस लावावा त्यात पाण्याचे प्रमाण अजिबात नसावे किंवा समान असावे. यामुळे तुमचे केस निरोगी तर होतीलच शिवाय कोंड्यापासून देखील सुटका मिळेल.
  10. त्वचेशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास नियमितपणे आल्याचा रस वापरण्यास सुरुवात करावी. यामुळे त्वचेवरील पुरळ आणि मुरुमांपासून कायमची सुटका मिळवू शकता.

(डिस्क्लेमर : लेखात दिलेला मजकूर ही सामान्य माहिती आहे. हे तज्ज्ञांचे मत नाही)