Top Recommended Stories

Benefits Of Honey : पावसाळ्यात मध ठरतो वरदान! या आजारांपासून मिळेल सुटका

Benefits Of Honey : मध सहज उपलब्ध होणारा पदार्थ आहे. मध एक आयुर्वेदिक औषध देखील आहे. मध हे एक प्रकारचे सुपरफूड असून त्याचे अनेक फायदे आहेत. पावसाळ्यात मधाचे सेवन एखाद्या वरदानापेक्षा कमी नसते.

Published: June 26, 2022 2:39 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Benefits Of Honey : पावसाळ्यात मध ठरतो वरदान! या आजारांपासून मिळेल सुटका
Benefits Of Honey In Monsoon

Benefits Of Honey In Monsoon: पावसाळ्यात पोटाच्या आरोग्याची (Stomach Health) काळजी घेणे अधिक गरजेचे असते. या हंगामात खाण्यापिण्यासंदर्भात आपल्याला अनेक प्रकारचे सल्ले मिळत असतात. परंतु आयुर्वेदात एका विशेष पदार्थाचा उल्लेख आहे. आयुर्वेदानुसार पावसाळ्यात या पदार्थाचे सेवन केल्याने शरीराला अनेक पटीने फायदा होतो. तो दैवी पदार्थ म्हणजे मध. पावसाळ्यात मधाचे सेवन केल्याने अनेक फायदे (Benefits Of Honey In Monsoon) होतात.

मध सहज उपलब्ध होणारा पदार्थ आहे. मध एक आयुर्वेदिक औषध ((Benefits Of Honey) देखील आहे. मध हे एक प्रकारचे सुपरफूड (Superfood) असून त्याचे अनेक फायदे आहेत. पावसाळ्यात मधाचे सेवन एखाद्या वरदानापेक्षा (honey consumption in rainy season) कमी नसते. मधाचे दररोज सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे होतात.

You may like to read

पावसाळ्यात मध कसा ठरतो वरदान?

  • मधात व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, एमिनो अॅसिड, कार्बोहायड्रेट्स हे मुख्य घटक असतात. यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. त्यामुळे मध जखमेवर, कापल्यास, भाजल्यास उत्तम औषध आहे. यामुळे जखम लवकर बरी होण्यास मदत होते.
  • या हंगामात मध शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो. मधाचे सेवन केल्यास संसर्गजन्य रोगांपासून देखील बचाव होतो.
  • घसा खवखवणे आणि सर्दी-तापेपासून आराम मिळवण्यासाठी देखील मध उपयुक्त ठरतो. खोकला दूर करण्यासाठी दोन चमचे मध आणि एक चमचा आल्याचा रस एकत्र करून सेवन करावा.
  • घसा खवखवत असल्यास किंवा खोकला झाल्यास काळी मिरीसोबत मधाचे सेवन करावे.
  • मधात असलेले पोषक घटक बद्धकोष्ठतेपासून मुक्तता मिळवण्यासाठी देखील मदत करतात. रात्री कोमट दुधात एक चमचा मध मिसळून प्यायल्याने फायदा होतो.

(डिस्क्लेमर: लेखात दिलेला सल्ला ही फक्त सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.)

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.