Top Recommended Stories

Benefits Of Makhana: हाडांच्या आणि डायबिटीजच्या समस्येने आहात त्रस्त, मखाना खाल्ल्याने होतील अविश्वसनीय फायदे!

Benefits Of Makhana: मखानामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात पोषण मिळते. ज्यामुळे शरीराचे स्नायू मजबूत होतात.

Updated: January 23, 2022 2:35 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Makhana
Makhana

Benefits Of Makhana: मखाना (Makhana) चवीसोबत आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. मखानामध्ये अनेक पोषक घटक आढळतात जे उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर (Beneficial For Health) असतात. त्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह आणि फॉस्फरस (Calcium, magnesium, iron and phosphorus) भरपूर प्रमाणात असते. कॅल्शियम हे विशेषतः हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर (Beneficial For Bones) असते. मखानामुळे रक्ताभिसरण वाढते. जर तुम्हाला कोलेस्टेरॉलशी संबंधित समस्या (Cholesterol Issue) असेल तर मखानाने ती कमी करण्यास मदत करते. माखनामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात पोषण मिळते. ज्यामुळे शरीराचे स्नायू मजबूत होतात. मखानाचे इतर आरोग्यदायी आणि अविश्वसनीय फायदे आज आपण जाणून घेणार आहोत…

Also Read:

साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रभावी (Effective in controlling sugar level) –

ज्या लोकांना डायबिटीजची समस्या आहेत. त्याच्या शरीरातील साखरेची पातळी वारंवार वाढते ते मखानाचे सेवन करून साखरेची पातळी नियंत्रणात ठेवू शकतात. हृदयाशी संबंधित सर्व समस्यांवर मखाना खाणे प्रभावी ठरू शकते.

You may like to read

कॅल्शियमचा उत्तम स्रोत (better source of calcium)-

हाडे मजबूत करण्यासाठी मखाना खाणे प्रभावी ठरू शकते. कारण मखानामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. जर कोणी सांधेदुखीचा रुग्ण असेल तर त्याने मखानाचे सेवन अवश्य करावे. व्यायाम केल्यानंतरही तुम्ही मखानांचे सेवन करू शकता.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर (beneficial in reducing weight) –

जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर तुम्ही भूक लागल्यावर मखानाचे सेवन करू शकता. हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मखाना हे मॅग्नेशियम, लोह आणि फॉस्फरसने समृद्ध आहे. याच्या सेवनाने शरीरात अशक्तपणा येत नाही आणि वजनही कमी होते.

वृद्धत्व विरोधी गुणधर्म (Has anti-aging properties)-

काही अभ्यासांमधून असे सुचवले आहे की, मखानामध्ये वृद्धत्व विरोधी गुणधर्म आहेत. मखानामध्ये ग्लूटामाइन, सिस्टीन, आर्जिनिन आणि मेथिओनाइन यासह अनेक अमीनो ऍसिड असतात जे वृद्धत्वविरोधी गुणधर्मांसाठी ओळखले जातात. याच्या वापराने तुम्ही त्वचेशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवू शकता. मखाना हे अँटिऑक्सिडंट्सचाही चांगला स्रोत आहे. ज्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी होण्यास मदत होते.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 23, 2022 1:52 PM IST

Updated Date: January 23, 2022 2:35 PM IST