Benefits Of Radish: हिवाळ्यात रोज खा मुळा, शुगर राहील नियंत्रणात, जाणून घ्या हे फायदे

Benefits Of Radish : हिवाळा येताच भाजी मार्केटमध्ये हंगामी फळे आणि भाज्या येण्यास सुरु

Published: January 10, 2022 3:56 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Benefits Of Radish Eat
विटामिन सी से हैं भरपूर

Benefits Of Radish : हिवाळा येताच भाजी मार्केटमध्ये हंगामी फळे आणि भाज्या येण्यास सुरुवात होते. हंगामी फळे आणि भाज्यांमध्ये मुळ्याचा (Radish) देखील समावेश असतो. मुळा कच्चा, शिजवून आणि लोणच्याच्या स्वरूपातही खाता येतो. मुळ्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आढळते. याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढते. मुळा खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि रक्तप्रवाह चांगला राहतो. मुळा खाण्याचे काय फायदे (Benefits Of Radish) आहेत येथे जाणून घेऊयात… (Eat radish daily in winter, sugar will be under control, know these benefits)

Also Read:

मधुमेहाचा धोका कमी होतो (Reduces risk of diabetes)

मुळा मध्ये रासायनिक संयुगे असतात, ते रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करतात. मुळा खाल्ल्याने शरीरात नैसर्गिक अॅडिपोनेक्टिन (प्रोटीन हार्मोन) तयार होते. शरीरात त्याचे प्रमाण जास्त असल्याने साखरेची पातळी नियंत्रणात राहते. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स देखील असतात ज्यामुळे मधुमेह होत नाही.

यकृतासाठी गुणकारी (Curative for liver)

मुळ्यामध्ये असे काही कंपाउंड असतात जे यकृत डिटॉक्सफाय करण्यास मदत करतात आणि त्याचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात.

हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले (Good for heart)

मुळ्यामध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियमसारखे अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजे असतात. हे रक्तदाब नियंत्रित ठेवतात आणि हृदयविकाराचा धोका टाळतो. मुळा देखील नैसर्गिक नायट्रेट्सचा चांगला स्रोत आहे. यामुळे रक्त प्रवाह सुधारतो.

कर्करोगाला घालतो प्रतिबंध (Prevents cancer)

मुळ्यामध्ये भरपूर प्रमाणात ग्लुकोसिनोलेट्स – सल्फर कंपाउंड असतात जे कर्करोगास कारणीभूत असलेल्या जेनेटिक म्‍यूटेशनपासून पेशींचे संरक्षण करते. एवढेच नाही तर ते ट्यूमरच्या पेशीही तयार होऊ देत नाही.

पचनास उपयुक्त (Suitable for digestion)

मुळा आरोग्यासाठी चांगला असतोच शिवाय त्याचे सेवन केल्याने पचन क्रिया देखील सुरुळीत होते. मुळ्यामध्ये फायबर असते. ते अन्न पचण्यास मदत करते. मुळा खाल्ल्याने अपचन किंवा बद्धकोष्ठता देखील होत नाही.

(डिस्क्लेमर : लेखात दिलला मजकूर ही सामान्य माहिती आहे. हे तज्ज्ञांचे मत नाही)

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 10, 2022 3:56 PM IST