Benefits of Thursday: गुरुवारी हे 5 उपाय केल्यास मिळेल नशिबाची साथ, विवाहातील अडचणी होतील दूर

विवाहातील अडचणी होतील दूर होतात. म्हणून गुरुवारच्या पूजेचे ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व आहे.

Published: January 6, 2022 1:19 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Benefits of Thursday: गुरुवारी हे 5 उपाय केल्यास मिळेल नशिबाची साथ, विवाहातील अडचणी होतील दूर

Benefits of Thursday: गुरुवार हा बृहस्पतीचा (Jupiter) वार. ज्योतिषशास्त्रानुसार (Jyotish), गुरुला भाग्य आणि धर्मकारक ग्रह मानले जाते. या दिवशी गुरु ग्रहाची (Jupiter) पूजा केल्याने कुंडलीतील सर्व दोष दूर होऊ शकतात. कुंडलीत (Kundali) गुरुचे स्थान महत्त्वाचे मानले जाते. गुरुवारी बृहस्पतीची विशेष पूजा केली जाते. कुंडलीतील गुरु ग्रहाच्या स्थितीचा वैवाहिक जीवनावरही प्रभाव पडतो. गुरु शुभ स्थानात असेल तर आपल्याला नशिबाची साथ मिळते. तसेच पती-पत्नीमधील प्रेम कायम राहते. विवाहातील अडचणी होतील दूर होतात. म्हणून गुरुवारच्या पूजेचे ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व आहे.

Also Read:

कुंडलीत गुरु ग्रहाशी संबंधित दोष असल्यास आपल्याला विविध अडचणींचा सामना करावा लागतो. कोणत्याही कामात यश मिळत नाही. मोठा संघर्ष करावा लागतो. यासाठी आम्ही आपल्याला गुरुवारचे काही उपाय सांगत आहोत. तुम्ही ते केल्यास तुम्हाला नशिबाची साथ मिळू शकते.

गुरुच्या 108 नावांचा जप करा… Benefits of Thursday

गुरुवार हा सर्व गुरूंचा वार आहे. या दिवशी गुरुच्या 108 नावांचा जप करावा. केळीच्या झाडावर जल अर्पण करावे. तूपाचा दिवा लावावा. हा उपाय केल्याने विवाहातील अडचणी दूर होतात. तरुण-तरुणींचे विवाह जुळतात.

आहारात पिवळ्या रंगाच्या पदार्थाचा समावेश करा…

विवाह इच्छूक तरुण-तरुणींनी गुरुवारी बृहस्पतीचे व्रत करावे. या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. आहारात देखील पिवळ्या रंगाचे पदार्थाचा समावेश करावा.

देवघरात हळदीची माळ लावा…

तुम्हाला व्यवसायात अनेक अडथळे येत असल्यास गुरुवारी देवघरात हळदीची माळ लावा. दुकानात पिवळ्या रंगाच्या वस्तूंचा वापर जास्त करावा. लक्ष्मी-नारायणाच्या मंदिरात गुरुवारी मोतीचूर लाडूचा नैवेद्य द्यावा.

स्त्रियांनी केस धुऊ नये, नखे कापू नये…

घरातील दारिद्रय दूर करण्यासाठी गुरुवारी कुटुंबातील सदस्यांनी विशेषकरून स्त्रियांनी केस धुऊ नये. त्याचबरोबर नखे देखील कापू नये.

पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करा..

नोकरी-व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी गुरुवारी एखाद्या मंदिरात जाऊन पिवळ्या वस्तू दान कराव्या. उदा. खाद्य पदार्थ, फळे, वस्त्र, पितळाच्या वस्तू.

(Disclaimer: ही माहिती सामान्य गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. India.com याचे समर्थन करत नाही.)

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 6, 2022 1:19 PM IST