मुंबई: हिंदूंचा सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळीला सणांची माळ म्हटलं जातं. पाच दिवस चालणारा हा सण केवळ दीपावलीपुरता मर्यादित नसून हिंदू धर्माच्या श्रद्धेचा मोठा सण आहे. हा सण भाऊबीजपर्यंत (Bhaubeej) सुरू राहतो. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी आणि दिवाळी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज (Bhaubeej 2021) सण साजरा केला जातो. रक्षाबंधनाप्रमाणेच हा सण बहिण-भाऊ यांचे एकमेकांप्रती असलेला स्नेह व्यक्त करण्याचा दिवस आहे. पौराणिक कथेनुसार भावाच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी यमराजाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे.Also Read - Tulsiche Lagna 2021 : आज आहे तुळशीचे लग्न? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व?

कधी आहे भाऊबीज (Bhaubeej 2021 Date, Shubh Muhurta)

हिंदू दिनदर्शिकेनुसार या वर्षी भाऊबीजचा पवित्र सण 6 नोव्हेंबर 2021 रोजी (शनिवार) आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या वर्षी भावाला तिलक करण्याचा शुभ मुहूर्त दुपारी 1:10 ते दुपारी 3:21 पर्यंत आहे. म्हणजेच शुभ मुहूर्ताचा एकूण कालावधी 2 तास 11 मिनिटे आहे. Also Read - Lakshmi Pujan 2021 : कधी करावे महालक्ष्मी पूजन? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा नियम

भाऊबीज पूजा विधी (Bhaubeej Puja Vidhi)

हिंदू धर्मात रक्षाबंधनाप्रमाणे भाऊबीजलाही विशेष महत्त्व आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाला टिळा लावतात आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करतात. भावाला टिळा लावण्यासाठी प्रथम पूजेचे ताट फळे, फुले, दिवे, अक्षत, मिठाई, सुपारी इत्यादींनी सजवावे. यानंतर तुपाचा दिवा लावल्यानंतर भावाची आरती करा आणि शुभ मुहूर्त पाहून टिळा लावा. टिळा लावल्यानंतर भावाला पान, मिठाई वगैरे खाऊ घाला.टिळा आणि आरतीनंतर भावाने आपल्या बहिणीचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा घ्यावी आणि तिला भेटवस्तू द्यावी. पौराणिक कथेनुसार बहिणी भाऊबीजच्या निमित्ताने आपल्या भावाला टिळा लावतात तेव्हा भावाच्या आयुष्यावर येणारे सर्व संकट नष्ट होतात आणि त्याला त्याच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी प्राप्त होते. या दिवशी बहिणीच्या घरी भोजन केल्याने विशेष फळ मिळते. Also Read - Tulsiche Lagna 2021 : कधी आहे तुळशीचे लग्न? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि काय आहे महत्त्व?

भाऊबीजची पौराणिक कथा (Bhaubeej katha)

भाऊबीज बद्दल एक पौराणिक कथा अतिशय प्रचलित आहे. पौराणिक कथेनुसार सूर्यदेव आणि त्याची पत्नी संज्ञा यांना मुले झाली, मुलाचे नाव यम आणि मुलीचे नाव यमुना होते. संज्ञाला भगवान सूर्यदेवांचा तप सहन झाला नाही आणि तिने स्वतःची सावली निर्माण केली आणि आपल्या मुलाला आणि मुलीला सोपवून माहेरी गेली. त्या सावलीला आपल्या मुलांशी कसलीही ओढ नव्हती. पण या दोन्ही भावा-बहिणींमध्ये खूप प्रेम होतं. लग्नानंतर यमुना नेहमी आपल्या भावाला आपल्या घरी जेवायला बोलावत असे, पण व्यस्ततेमुळे यमराज यमुनाचा अग्रह टाळत असत. कारण त्यांना त्यांच्या कामातून पुरेसा वेळ मिळत नव्हता. पण बहिणीच्या खूप आग्रहानंतर यमराज यमुनेला भेटण्यासाठी कार्तिक शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी तिच्या घरी पोहोचले. यमुनेने त्यांचे स्वागत केले आणि कपाळावर टिळा लावून त्यांना भोजन दिले. बहिणीच्या आदराने प्रसन्न होऊन यमदेवाने तिला काहीतरी मागायला सांगितले. तेव्हा यमुनेने तिला दरवर्षी या दिवशी घरी येण्याचे वरदान मागितले. यमुनेची ही विनंती मान्य करत यम देवाने तिला काही दागिने आणि भेटवस्तू दिल्या. या दिवशी बहिणीने टिळा लावलेल्या भावाला कधीही अकाली मृत्यूची भीती वाटत नाही असे मानले जाते. या दिवसाला यम द्वितीया असेही म्हणतात.