By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Breakfast Ideas: नाश्त्यात करा गोड काश्मिरी पुलावचा समावेश, जाणून घ्या संपूर्ण रेसिपी
Kashmiri Pulao Recipe: अनेक वेळा सकाळी नास्त्यात काय बनवावे असा प्रश्न पडतो. सध्या काळात प्रत्येकालाच आपल्या दिवसाची सुरुवात निरोगी आणि पौष्टिक आहाराने (Nutritious diet) व्हावी असे वाटत असते. त्यामुळे अनेक जण नाश्त्यात नवनवीन आणि निरोगी पदार्थ वापरत असतात.

Kashmiri Pulao Recipe: अनेक वेळा सकाळी नास्त्यात काय बनवावे (Breakfast Idea) असा प्रश्न पडतो. सध्या काळात प्रत्येकालाच आपल्या दिवसाची सुरुवात निरोगी आणि पौष्टिक आहाराने (Nutritious diet) व्हावी असे वाटत असते. त्यामुळे अनेक जण नाश्त्यात नवनवीन आणि निरोगी पदार्थ वापरत असतात. तुम्हाला देखील तुमच्या कुटुंबातील सदस्यांना नाश्त्यात काही आरोग्यदायी खायला द्यायचे असेल तर काश्मिरी पुलाव (Kashmiri Pulao) तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. काश्मीरी पुलाव चवीला गोड आणि आरोग्यासाठी देखील अतिशय पौष्टिक (Nutritious Breakfast) असतो. त्यामुळे तुमच्या आहारात याचा समावेश केल्यास सकाळी चवदार नास्त्यासोबत तुमच्या दिवसाची सुरुवात देखील निरोगी होईल. यामुळे तुम्हाला उर्जावान राहण्यास देखील मदत होईल. असा हा काश्मिरी पुलाव कासा बनवावा याची रेसिपी (Breakfast Recipe) आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत. जाणून घेऊया घरी काश्मिरी पुलाव बनवण्याची रेसिपी….(Includes Sweet Kashmiri Pulao in Breakfast, Learn The Complete Recipe)
Also Read:
काश्मिरी पुलाव बनवण्यासाठी लागणारे साहित्य (Kashmiri Pulao Recipe)
तांदूळ – 1 कप
दूध – 1 कप
सुका मेवा – 1/4 कप
क्रीम – 1/4 कप
जिरे – 1/2 चमचा
साखर – 1/2 चमचा
मीठ – चवीनुसार
तूप – 1 चमचा
वेलची, तमालपत्र, लवंगा, दालचिनी – 1
काश्मिरी पुलाव रेसिपी (Kashmiri Pulao Recipe)
- सर्वात आधी दुध घ्या. त्यात मलई, साखर पावडर आणि साखर घालून मिक्स करावे.
- आता कढईत तूप घ्या आणि त्यात जिरे, दालचिनी, तमालपत्र, लवंग वेलची घाला आणि चांगले तळून घ्या.
- यानंतर तांदूळ नीट धुवून कढईत टाका.
- आता वर नमूद केलेले दुधाचे मिश्रण तांदळाच्या पातेल्यात घ्या आणि पाणी घाला.
- यानंतर तांदूळ व्यवस्थित शिजू द्या.
- शेवटी तयार झालेल्या पुलावमध्ये ड्रायफ्रुट्स टाका आणि व्यवस्थित सर्व्ह करा.
(टीप – या लेखात नमूद केलेल्या मुद्द्यांवरून असे लक्षात येते की काश्मिरी पुलाव आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. परंतु जर तुम्हाला या लेखात दिलेल्या कोणत्याही घटकाची अॅलर्जी असेल तर त्याचा आहारात समावेश करू नका.)
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या