Breakfast Ideas: घरीच 10 मिनिटांत बनवा चविष्ट बॉम्बे सँडविच, जाणून घ्या ही सोपी रेसिपी
Bombay Sandwich Recipe: बर्याचदा आपल्याला नाश्त्यात अशा पदार्थ बनवायचा असतो जो आरोग्यदायी असेल आणि लवकर बनवता येईल. त्यामुळे आम्ही तुम्हाला आज बॉम्बे सँडविचची रेसिपी सांगत आहोत. ही रेसिपी तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरू शकते.

Bombay Sandwich Recipe: बर्याचदा आपल्याला नाश्त्यात अशा पदार्थ बनवायचा असतो जो आरोग्यदायी असेल आणि लवकर बनवता येईल. त्यामुळे आम्ही तुम्हाला आज बॉम्बे सँडविचची (Bombay Sandwich) रेसिपी सांगत आहोत. ही रेसिपी तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरू शकते. घरातील लहान असो किंवा मोठे सर्वांनाच चवदार सँडविच (Delicious Sandwiches) आवडते. त्यामुळे तुम्ही त्यांना बॉम्बे सँडविच बनवून खायला देऊ शकता. हे सँडविच घरी कसे बनवायचे? (How to make Bombay Sandwich) असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आज आम्ही तुम्हाला घरीच बॉम्बे सँडविच बनवण्याची (Make Delicious Bombay Sandwiches) सोपी रेसिपी सांगणार आहोत.
Also Read:
बॉम्बे सँडविचसाठी लागणारे साहित्य
काकडीचे तुकडे – 1/4 कप
चाट मसाला – 1/4 चमचा
ब्रेडचे तुकडे – 2
सिमला मिरची – 1/4 कप
कांदा – 1 किंवा 2
उकडलेले बटाट्याचे तुकडे – 2
टोमॅटोचे तुकडे
मीठ – चवीनुसार
हिरवी चटणी – 2 चमचे
बॉम्बे सँडविच बनवण्याची पद्धत
- सर्वप्रथम ब्रेडचे दोन स्लाईस घेऊन त्यावर बटर लावा. तुम्ही तूपही लावू शकता.
- यानंतर हिरवी चटणी लावा. हिरवी चटणी घरीच बनवलेली आणि ताजी असेल याची काळजी घ्या.
- हिरवी चटणी लावल्यानंतर काही सेकंद थांबा.
- त्यानंतर उकडलेल्या बटाट्याचे तुकडे ठेवा.
- आता बटाट्यावर कांद्यासोबत टोमॅटो आणि काकडीचे तुकडे ठेवा.
- भाजी घालायची आणि किती कमी करायची हे आपल्या हातात असते. तुम्हाला फक्त कांदे आणि टोमॅटो वापरायचे असतील तर तुम्ही
- कांदे आणि बटाट्यासोबत बॉम्बे सँडविच बनवू शकता. लक्षात घ्या की बटाटा मुख्य घटकांपैकी एक आहे.
- चहूबाजूंनी मीठ आणि चाट मसाला शिंपडा.
- एका पातेल्यात बटर किंवा तूप टाकून सँडविच दोन्ही बाजूंनी तळून घ्या.
- आता टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या