Budh Ashtami 2022 : कधी आहे बुध अष्टमी? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व
Budh Ashtami 2022: बुध अष्टमीच्या दिवशी बुधग्रहासह (Mercury) भगवान शिव (Lord Shiva) आणि पार्वतीची (Mata Parvati) पूजा केल्यास आपल्या हातून कळत-नकळत झालेली पापे नष्ट होतात.

Budh Ashtami 2022: बुध अष्टमीच्या दिवशी बुधग्रहासह (Mercury) भगवान शिव (Lord Shiva) आणि पार्वतीची (Mata Parvati) पूजा केल्यास आपल्या हातून कळत-नकळत झालेली पापे नष्ट होतात. फेब्रुवारीमध्ये बुध अष्टमी कधी आहे, शुभ मुहूर्त आणि महत्त्व याबाबत आम्ही आपल्यासाठी माहिती घेऊन आलो आहे. तसेच वर्षभरात बुध अष्टमी किती? हेही जाणून घेणार आहोत.
Also Read:
बुध अष्टमीच्या दिवशी बुध ग्रहाची पूजा केली जाते. भाविक उपवास करतात. विशेष ‘नैवेद्य’ तयार करून बुध देवतेला अर्पण केला जातो. उपवास करणार्यांनी पूजाविधी पूर्ण केल्यानंतरच हा प्रसाद आपण खाऊ शकतो. भक्त सोन्याच्या किंवा चांदीच्या नाण्यावर कोरलेल्या बुद्ध देवतेच्या प्रतिमेची पूजा करतात. पूजेच्या ठिकाणी पाण्याने भरलेला कलश ठेवला जातो आणि त्यावर न सोललेला शहाळे ठेवले जाते.
बुधग्रहाची पूजा झाल्यानंतर ‘नैवेद्य’ अर्पण केला जातो. भाविकांना प्रसाद दिला जातो. बुध अष्टमीचे व्रत दरवर्षी 8 वेळा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते. आठ व्रत पूर्ण केल्यानंतर भगवान बुधाचे चित्र असलेले सोन्याचे किंवा चांदीचे नाणे ब्राह्मणाला दान केले जाते. अनेक ठिकाणी या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीचीही पूजा केली जाते.
बुध अष्टमी तिथी (Ashtami Tithi Timing)
– 23 फेब्रुवारीला सायंकाळी 4 वाजून 56 मिनिटांला प्रारंभ.
– 24 फेब्रुवारी दुपारी 3 वाजून 04 वाजेपर्यंत.
सन 2022 मध्ये किती आणि केव्हा आहे बुध अष्टमी (Budh Ashtami Vrat dates in 2022)
> 23 फेब्रुवारी : सायंकाळी 4 वाजून 56 मिनिटांला प्रारंभ आणि 24 फेब्रुवारी दुपारी 3 वाजून 04 वाजता समाप्ती
> 20 जुलै : सकाळी 7 वाजून 36 मिनिटांला प्रारंभ, 21 जुलैला सकाळी 8 वाजून 12 मिनिटांला समाप्ती
> 16 नोव्हेंबर : सकाळी 5 वाजून 50 मिनिटांला प्रारंभ, 17 नोव्हेंबरला सकाळी 7 वाजून 57 मिनिटांला समाप्ती
> 30 नोव्हेंबर : सकाळी 8 वाजून 58 मिनिटांला प्रारंभ, 01 डिसेंबरला सकाळी 7 वाजून 21 मिनिटांला समाप्ती
बुध अष्टमीचे महत्त्व (Significance of Budh Ashtami Vrat):
बुध अष्टमी व्रत आणि महत्त्व ‘ब्रह्मण्ड पुराण’ आणि इतर अनेक हिंदू धर्म ग्रंथांमध्ये आले आहे. बुध अष्टमी व्रत करणाऱ्या व्यक्तीची अनेक पापांमधून मुक्तता होते. इतकेच नाही तर या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने गेल्या जन्मांचे देखील पाप धुतले जातात, असे मानले जाते. बुध अष्टमीचे व्रत केल्याने कुंडलीत बुध ग्रहाचा दोष दूर होतो.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या