Top Recommended Stories

Budhwar Che Upay : बुधवारी करा 'या' वस्तूंचे दान, करिअरमधील अडचणी होतील दूर

Budhwar Che Upay : हिंदू धर्मात (Hindu Dharma) प्रत्येक दिवस हा कोणत्या न कोणत्या देवाला समर्पित आहे. त्यानुसार बुधवार हा भगवान श्री गणेश आणि माता दुर्गाला  समर्पित आहे. ज्योतिषानुसार (Jyotish) बुधवारला विशेष महत्त्व (budhwar Mahatva) आहे. या दिवशी विधिवत पूजा (Budhwar Puja Vidhi) करत काही उपाय केल्याने करिअरमध्ये प्रगती होते.  

Published: April 27, 2022 8:25 AM IST

By India.com News Desk | Edited by Vikas Chavhan

Budhwar Che Upay : बुधवारी करा 'या' वस्तूंचे दान, करिअरमधील अडचणी होतील दूर

Budhwar Che Upay : बुधवारचा दिवस हा भगवान श्री गणेश (Lord Ganesh ) व माता दुर्गासाठी (Durga Mata ) समर्पित आहे. मान्यतेनुसार या दिवशी भगवान श्री गणेश व माता दुर्गाचे विधिवत पूजन (Bhudhwar Puja Vidhi ) केल्याने त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. यासह काही ज्योतिष उपाय (Astrology Remedies ) देखील सांगण्यात आले आहे. हे उपाय केल्याने बुध ग्रह (Budh Grah Upay  ) मजबूत होत करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग खुलतात. त्यानुसार जाणून घेऊया बुधवारच्या उपाय संदर्भात अधिक माहिती…

या वस्तूंचे करा दान

बुधवारच्या दिवशी दान करणे करिअरसाठी खूप लाभदायक ठरते. या दिवशी हिरव्या वस्तूंचे दान केले पाहिजे. त्यानुसार तुम्ही गरजूंना मूग डाळ, हिरव्या रंगाचे कपडे, किंवा सुहासिनी महिलांना बंगाड्या दान करू शकतात. असे केल्याने करिअरमध्ये प्रगती होते अशी मान्यता आहे.

You may like to read

गणेश वंदना

भगवान श्री गणपतीला ज्योतिषानुसार विशेष महत्व आहे. कोणतेही धार्मिक कार्य असो गणेश पूजनाने त्याची सुरुवात होते. त्यामुळे बुधवारी श्री गणपतीची विधिवत पूजा केली पाहिजे. पूजा करताना ‘ॐ ग्लौम गणपतयै नमः’ या मंत्राचा जप जरूर करावा. यासह गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवावा.

दुर्गा सप्तशती पाठ

बुधवारचा दिवस हा माता दुर्गासाठी देखील समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी दुर्गा सप्तशती पाठ करावा. असे केल्याने माता दुर्गा प्रसन्न होत भक्तांना आशीर्वाद देतात. जर वेळा नसेल तर किमान 12 वा अध्याय आणि कुंजीकास्तोत्रचा पाठ केला तरी चालतो.

हिरव्या रंगाचे कपडे घाला

या दिवशी घरातून बाहेर पडताना कपाळावर सिंदूरचा टिळा लावा. या दिवशी हिरवे कपडे घालावे. हिरव्या रंगाचे कपडे नसतील तर हिरावा रुमाल जवळ ठेवावा. यासह या दिवाशी गायला चारा खाऊ घाला. असे केल्याने सकारात्मक फळ प्राप्त होते. वर्षातून किमान एकदा आपल्या वजनाबरोबर चारा बुधवारी विकत घेत तो चारा गोशाळेत दान केला पाहजे.

करा हा विशेष उपाय

बुधवारच्या दिवशी जर कोणी तृतीयपंथी दिसला तर त्याला काही पैसे किंवा श्रृंगाराचे साहित्य दान करावे. असे केल्याने धन, व्यपार आणि शिक्षणात यश प्राप्त होते अशी मान्यता आहे.

(Disclaimer:  – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. india.com याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.