By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Budhwar Che Upay : भगवान गणपतीचा आशीर्वाद हवा असल्यास बुधवारी टाळा 'या' गोष्टी, अन्यथा होईल मोठे नुकसान
Budhwar Che Upay : बुधवारी भगवान गणेश आणि दुर्गा माता यांची पूजा केली जाते. हा दिवस बुध ग्रहाला देखील समर्पित आहे. बुधवारी काही उपाय केल्याने करिअरमध्ये प्रगती होते. यासह आर्थिक आणि शारीरिक वेदनाही दूर होतात.

Budhwar Upay: वैदिक हिंदू धर्मानुसार (Hindu Dharma) बुधवारला विशेष महत्त्व आहे. बुधवारचा दिवस हा भगवान गणपती (Lord Ganesha) तसेच बुध देवाला (Budh Dev) समर्पित आहे. नवग्रहांमध्ये बुध ग्रहाला (mercury planet) तटस्थ ग्रह मानले जाते. बुध ग्रहाची (Budh Grah) युती ज्या ग्रहांसोबत होते, त्या ग्रहानुसार बुध (Budh grah) फळ देतात. बुध ग्रहाला वाणी, बुद्धी, गणित आणि संवादाचे कारक मानले जाते. बुधवारच्या दिवशी काही उपाय (Bhudhwar Upay) केल्याने विशेष लाभ होतो. मात्र अशा काही गोष्टी आहेत ज्या बुधवारी टाळल्या पाहिजे. या गोष्टी टाळल्यास गणपतीचा (Lord Ganapati) आशीर्वाद लाभतो आणि व्यक्तीच्या जीवनातील संकटं दूर होतात. चला तर मग जाणून घेऊया बुधवारी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे याविषयी…
कठोर शब्द प्रयोग टाळावा
बुध ग्रहाला वाणी आणि संवादाचे कारक मानले गेले आहे. त्यामुळे या दिवाशी कठोर आणि कटू शब्द प्रयोग करू नये. या दिवशी मधुर वाणी आणि प्रेमाने बोलल्यास जीवनातील आर्थिक अडचणी दूर होतात. सोबत घरात सुख समृद्धी नांदते.
आर्थिक व्यवहार टाळा
मान्यतेनुसार बुधवारच्या दिवशी उधारीचे आर्थिक व्यवहार करू नये. या दिवशी आर्थिक देवाण-घेवाण केल्यास आर्थिक गोष्टींमध्ये यश मिळत नाही. त्यामुळे बुधवारी कर्ज घेणे टाळावे.
Trending Now
गुंतवणूक करू नका
ज्योतिष शास्रानुसार बुधवारी कुठल्याही प्रकारची गुंतवणूक किंवा व्यवहार करू नये. असे केल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे चुकूनही या दिवशी गुंतवणूक करू नक. शुक्रवार हा गुंतवणुकीसाठी शुभ दिवस मानला जातो.
काळे कपडे वापरू नये
बुधवारच्या दिवशी सुखी वैवाहिक जीवन आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिलांनी काळे वस्त्र परिधान करू नये. यासह विवाहित महिलांनी काळ्या रंगाचे दागिने देखील घालू नये.
पश्चिम दिशेला यात्रा करू नये
ज्योतिषानुसार बुधवारी पश्चिम दिशेला दिशाशूल असते. त्यामुळे बुधवारी पश्चिम दिशेला यात्रा कारणे अशुभ मानले जाते. बुधवारी पश्चिम दिशेला यात्रा करू नये.
(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. india.com याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या