Top Recommended Stories

Chaitra Navratri 2022 Date: जाणून घ्या कधी सुरू होतेय चैत्र नवरात्री, येथे पाहा संपूर्ण कॅलेंडर

Chaitra Navratri 2022 Date: एप्रिल महिन्यातील 2 तारखेपासून मराठी कॅलेंडरनुसार चैत्र महिन्याला सुरुवात होत आहे. चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदा तिथीपासून चैत्र नवरात्रीची सुरुवात होते. या दिवसात दुर्गा मातेची पूजा केली जाते आणि देवीला प्रसन्न केले जाते.

Published: March 26, 2022 7:29 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Shardiya Navratri 2022
Shardiya Navratri 2022

Chaitra Navratri 2022 Date: एप्रिल महिन्यातील 2 तारखेपासून मराठी कॅलेंडरनुसार चैत्र महिन्याला सुरुवात होत आहे. चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदा तिथीपासून (Chaitra Navratri 2022 ) चैत्र नवरात्रीची सुरुवात होते. या दिवसात दुर्गा मातेची पूजा केली जाते आणि देवीला प्रसन्न केले जाते. या नवरात्रीत एका कलशाची स्थापना करून शैलपुत्रीची पूजा केली जाते. यंदा चैत्र नवरात्री 2 एप्रिलपासून सुरू होत आहे तर 11 एप्रिल रोजी संपतील.

हिंदू पंचांगनुसार वर्षातून चार वेळा नवरात्री साजरी (Navratri 2022) केली जातात. यात चैत्र आणि शारदीय नवरात्रीला (Chaitra Navratri 2022) विशेष महत्त्व आहे. यावर्षी 2 एप्रिल 2022 पासून चैत्र नवरात्री सुरु होत असून 11 एप्रिल 2022 रोजी समाप्त होईल. अतिशय पवित्र मानल्या जाणाऱ्या या नवरात्रोत्सोवात भक्त 9 दिवस दुर्गा देवीची मनोभावे पूजा अर्चना करतात. नवरात्रीत विधिवत घटस्थापना करून पूजा केली जाते. ही पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे.

You may like to read

चैत्र नवरात्री कॅलेंडर (Chaitra Navratri 2022 Calendar)

2 एप्रिल : नवरात्रीचा पहिला दिवस, घटस्थापना, देवी शैलपुत्री पूजा – शनिवार
3 एप्रिल : दुसरा दिवस देवी ब्रह्मचारिणी पूजा – रविवार
4 एप्रिल : तिसरा दिवस देवी चंद्रघंटा पूजा – सोमवार
5 एप्रिल : चौथा दिवस देवी कुष्मांडा पूजा – मंगळवार
6 एप्रिल : पाचवा दिवस देवी स्कंदमाता पूजन – बुधवार
7 एप्रिल : सहावा दिवस देवी कात्यायनी पूजा – गुरुवार
8 एप्रिल : सातवा दिवस देवी कालरात्री पूजा महासप्तमी, शुक्रवार
9 एप्रिल : आठवा दिवस देवी महागौरी पूजा, दुर्गा अष्टमी, कन्या पूजन – शनिवार
10 एप्रिल : नववा दिवस रामनवमी रामजन्मोत्सव, रविवार
11 एप्रिल : दाहावा दिवस नवरात्रीचे पारण, सोमवार

घटस्थापना मुहूर्त (Ghatsthapana Muhurat)

घटस्थापना तिथी – 2 एप्रिल, शनिवार
घटस्थापनेचा मुहूर्त – सकाळी 6:01 वाजेपासून ते 8:31 वाजेपर्यंत दरम्यान
अभिजीत मुहूर्त – दुपारी 12:00 वाजेपासून ते 12:50 वाजेपर्यंत

घटस्थापना विधी (Chaitra Navratri 2022 Ghatasthapana Vidhi)

घटस्थापनेसाठी सकाळी लवकर उठून अंघोळ केल्यानंतर स्वच्छ कपडे घालावे. यानंतर पूजेचे ठिकाण किंवा मंदिराची साफसफाई करून खाली लाल वस्त्र टाकावे. त्यावर अक्षता आणि धान्य टाकून त्यावर पाण्याने भरलेला कळस ठेवावा. कळसावर स्वस्तिक काढावे. कळसामध्ये सुपारी, नाणे आणि अक्षदा टाका. त्यानंतर नारळाला कापड गुंढाळून ते नारळ कळसावर ठेवा आणि देवीचे नामस्मरण करत आवाहन करावे. त्यानंतर दिवा लावून कळसाची आणि दुर्गा मातेचे पूजन करावी.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.