Top Recommended Stories

chanakya neeti: आपली ही चूक देते शत्रूला जिकंण्याची संधी; जाणून घ्या काय सांगते चाणक्य निती

chanakya neeti: एखादी व्यक्ती यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घेते. अनेक प्रकारची धोरणे स्वीकारते, परंतु शत्रूचा एक अडथळा त्याचे सर्व प्रयत्न उधळून लावतो. असं असलं तरी प्रत्येक व्यक्तीला काही ना काही शत्रू असतात.

Published: January 28, 2022 9:59 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

chanakya neeti: आपली ही चूक देते शत्रूला जिकंण्याची संधी; जाणून घ्या काय सांगते चाणक्य निती
Chankya niti

chanakya neeti: एखादी व्यक्ती यशस्वी (Success in life) होण्यासाठी खूप मेहनत घेते. अनेक प्रकारची धोरणे स्वीकारते, परंतु शत्रूचा एक अडथळा त्याचे सर्व प्रयत्न उधळून लावतो. असं असलं तरी प्रत्येक व्यक्तीला काही ना काही शत्रू (enemy) असतात. पण यशस्वी व्यक्ती किंवा यशाच्या मार्गावर वाटचाल करणाऱ्या व्यक्तीला अनेक छुपे शत्रू असतात. व्यक्तीला पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी ते अनेक युक्त्या वापरतात आणि अनेकदा यशस्वी होतात. आचार्य चाणक्य म्हणतात (Chanakya niti) जर एखाद्या व्यक्तीने काही चुका केल्या नाहीत तर शत्रू कधीही त्याच्या मार्गात अडथळे आणू शकत नाहीत.

Also Read:

चुकूनही करू नका या चुका (don’t do this mistake)

चाणक्य नीतीमध्ये अशा काही चुका सांगितल्या आहेत ज्या टाळता आल्या तर ज्ञात किंवा अज्ञात शत्रू तुमचे नुकसान करू शकणार नाहीत.

You may like to read

क्रोध : क्रोध किंवा राग ही अशी एक गोष्ट आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती आपली संवेदना गमावते. रागाच्या भरात तो अशा गोष्टी करतो ज्या त्याच्या प्रतिमेसाठी अयोग्य आणि यशात अडथळा ठरतात. शत्रू या चुकीच्या कृत्ये किंवा वागणुकीला लक्ष्य करून तुमच्या प्रतिमेचे खूप नुकसान करू शकतात. त्यामुळे नेहमी क्रोधीत होणे टाळा.

शत्रूला कमकुवत समजू नका : कोणत्याही युद्धात जिंकायचे असेल तर शत्रूला कमकुवत समजण्याची चूक कधीही करू नका. कारण यशस्वी व्यक्तीचा पराभव करण्यासाठी अनेक शत्रू एकत्र येतात. अशा वेळी हे लक्षात ठेवा की लढाई उंदराशी असली तरी विजयासाठी तयारी ही नेहमी सिंहाशी लढण्याची असावी. जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत तुमचा पराभव होणार नाही.

अहंकार : अहंकार ही अशी गोष्ट आहे ज्यामुळे माणूस चांगलं आणि वाईटाची पारख करण्यात असमर्थ ठरतो. अहंकारात तो शत्रूच्या सामर्थ्याचे आकलन करू शकत नाही किंवा त्याच्या हालचाली समजू शकत नाही आणि त्यामुळे संकटात सापडतो. त्यामुळे शत्रूवर मात करण्यासाठी नेहमी सतर्क राहा आणि अहंकार टाळा.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 28, 2022 9:59 PM IST