Top Recommended Stories

Chanakya Niti : घाणीत पडलेल्या या वस्तू उचलण्यास कधीही संकोच करू नका, तुम्हाला होतील अनेक फायदे!

Chanakya Niti : घाणीत पडलेल्या वस्तूला सर्वजण घाणेरडे समजत असले तरी नैतिकतावादी चाणक्यांच्या नीतीनुसार दर्जेदार वस्तू घाणीत पडली तरी त्याची किंमत कमी होत नाही.

Published: February 28, 2022 3:34 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

चाणक्य निती
चाणक्य निती

Chanakya Niti : अस्वच्छतेत राहणे (Living in filth) कोणाला आवडते. माणसांसाठी स्वच्छतेचे (cleanliness) महत्त्व खूप सांगण्यात आले आहे. स्वच्छता असेल तर आपले आरोग्य चांगले राहते त्यासोबत आपला उत्साह देखील चांगला राहतो. घाणीत पडलेल्या वस्तूला सर्वजण घाणेरडे समजत असले तरी नैतिकतावादी (Moralist) चाणक्यांच्या नीतीनुसार (Chanakya Niti) दर्जेदार वस्तू घाणीत पडली तरी त्याची किंमत कमी होत नाही. अशा वस्तू उचलण्यास टाळाटाळ करू नये. चला तर मग जाणून घेऊया चाणक्य नीतीनुसार अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या घाणीत पडल्या असल्या तरी उचलायला मागेपुढे पाहू नका.

Also Read:

घाणीत पडेल्या या वस्तू उचलण्यास टाळाटाळ करु नका –

– सोने (Gold) हा अत्यंत मौल्यवान धातू आहे. त्यामुळे सोने चिखलात पडलेले असले तरी ते उचलले पाहिजे. कारण धूळ खात पडूनही सोन्याची किंमत कमी होणार नाही.

You may like to read

– चाणक्य नीतीनुसार शक्य असल्यास विषमिश्रित अमृत (Amrut) बाहेर काढण्याचा सल्ला दिला जातो. म्हणजेच वाईटातून चांगले शोधून ते स्वीकारणे हा गुण माणसाला जीवनात प्रगतीच्या मार्गावर घेऊन जातो.

– दुष्ट कुटुंबात जन्मलेल्या व्यक्तीला प्रत्येकजण चारित्र्यहीन मानतो. पण ही गोष्ट लक्षात ठेवा की, दुष्ट घराण्यात एखादी सद्गुणी आणि सुसंस्कृत मुलगी असेल तर तिच्याशी लग्न करायला अजिबात संकोच करू नका. कारण एक सद्गुणी माणूस प्रत्येक वाईट परिस्थितीत आपल्या गुणांनी सर्वांची मने जिंकतो.

– आचार्य चाणक्य यांच्या मते, एखाद्या नीच व्यक्तीला उत्कृष्ट ज्ञान असले तरी त्याच्याकडून ज्ञान घेण्यास मागेपुढे पाहू नका. कारण ते ज्ञान तुम्हाला जीवनातील अनेक प्रसंगांमध्ये यशस्वी बनवू शकते.

दरम्यान, आचार्य चाणक्यांचे निती (Chanakya Niti) मानवी जीवनासाठी कोणत्याही मार्गापेक्षा कमी नाही. आचार्य चाणक्य कौटिल्य आणि विष्णुगुप्त म्हणून ओळखले जातात. आचार्य चाणक्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि कौशल्याच्या जोरावर चंद्रगुप्त मौर्याला (Chandragupta Maurya) राजा बनवले. चाणक्य नेहमी इतरांच्या कल्याणाविषयी बोलत होते. या गोष्टी लक्षात घेऊन चाणक्यांनी नीतिशास्त्र (Ethics by Chanakya) नावाचा ग्रंथ रचला. अनेक जण चाणक्यांनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करतात आणि त्यांना याचा आयुष्यात खूप फायदा होतो.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 28, 2022 3:34 PM IST