Chanakya Niti: या 5 लोकांवर कधीच विश्वास ठेवू नका, नाही तर होईल आयुष्याचे मोठे नुकसान!
Chanakya Niti: आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये (Chanakya Niti for Successful Life) केले तर तुम्हाला कसल्याच अडचणी येणार नाहीत. चाणक्य नीतीमध्ये 5 प्रकारच्या वस्तू आणि लोकांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्या व्यक्ती आणि वस्तू कोणत्या आहेत हे घ्या जाणून...

Chanakya Niti: आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे उत्तम मुत्सद्दी, अर्थशास्त्रज्ञ असण्यासोबतच व्यावहारिक जीवनातही उत्तम मार्गदर्शक आहेत. त्यांनी आपल्या नीतिशास्त्रात (Chanakya Nitishastra) अशा अनेक गोष्टी लिहिल्या आहेत, ज्याचे पालन केल्याने माणूस अनेक संकटांपासून दूर राहू शकतो. तसंच छोट्या चुकांमुळे होणारे मोठे नुकसान तो टाळू शकतो. आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये (Chanakya Niti for Successful Life) केले तर तुम्हाला कसल्याच अडचणी येणार नाहीत. चाणक्य नीतीमध्ये 5 प्रकारच्या वस्तू आणि लोकांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्या व्यक्ती आणि वस्तू कोणत्या आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत…
Also Read:
चुकूनही या लोकांवर विश्वास ठेवू नका –
शस्त्र बाळगणारी व्यक्ती (People with weapons) –
चाणक्यांनी सांगितल्याप्रमाणे, ज्या व्यक्ती आपल्यासोबत शस्त्रे ठेवतात अशा व्यक्तींवर कधीही विश्वास ठेवू नका किंवा त्यांच्याशी संबंध ठेवू नका. जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा असे लोक तुमचे कधीही नुकसान करू शकतात. अशा व्यक्तींशी वैर करणे म्हणजे स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण देणे होय.
उच्च पदावर असणारी सामर्थ्यवान लोकं (Powerful people in high position) –
शक्तिशाली लोकांवर कधीही विश्वास ठेवू नका. त्यांच्याशी शत्रुत्वही करू नका. यामागे दोन मोठी कारणे आहेत. एक तर ते स्वतःच्या फायद्यासाठी तुम्हाला बळीचा बकरा बनवायला 2 मिनिटेही घालवणार नाहीत. दुसरे म्हणजे त्यांना तुमच्यावर राग आला तर ते तुम्हाला उद्ध्वस्त करून सोडतील. यासाठी ते त्यांच्या शक्तीचा थोडासा वापर करूनही तुमचे मोठे नुकसान करू शकतात.
दुष्ट स्त्री (Evil Woman) –
वाईट प्रवृत्ती असलेल्या स्त्रीवर कधीही विश्वास ठेवू नका. नकळत ती तुमचं खूप नुकसान करू शकते. तसेच, तुमची चूक नसतानाही ती तुम्हाला अडचणीत आणू शकते.
हिंसक आणि धोकादायक प्राणी (Violent and dangerous animals) –
हिंसक आणि धोकादायक प्राण्यांवर कधीही विश्वास ठेवू नका. तुम्ही त्यांची कितीही सेवा केली किंवा प्रेम केले तरी ते कधीही तुमचे नुकसान करू शकतात.
नदीची खोली आणि वेग (Depth and Velocity of the River) –
नदीच्या खोलीबद्दल आणि प्रवाहाबद्दल थोडासा गैरसमज तुम्हाला अडचणीत आणू शकतो. त्यामुळे नदीची खोली आणि वेगाबद्दल कोणतीही चूक करू नका.