Chankya Niti : 'या' लोकांची मदत कराल तर स्वतःवर ओढवून घ्याल संकट; जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीती!
Chankya Niti मित्र निवडतांना तसेच कोणाला मदत करावी हे ठरवितांना थोडी जरी चूक झाली तर तुमचे आयुष्य उध्वस्त होते. चुकीच्या लोकांना मदत केल्याने जीवनावर मोठा परिणाम होतो.

Chankya Niti : जीवनात यशाचे शिखर गाठायचे असल्यास (chankya niti for Success) चांगल्या सुसंस्कृत लोकांसोबत मैत्री केली पाहिजे. तसेच इतरांची मदत करणे पुण्याचे काम मानले जाते. मात्र मित्र निवडताना तसेच कोणाला मदत करावी हे ठरविताना थोडी जरी चूक झाली तर तुमचे आयुष्य उध्वस्त होते. चुकीच्या लोकांना मदत केल्याने जीवनावर मोठा परिणाम होतो. आचार्य चाणक्य (acharya chankya) यांनी आपल्या नीती शास्त्रात व्यावहारिक जीवनासंबंधी काही गोष्टी सांगितल्या आहेत. व्यक्तीने कोणाला मदत करावी आणि कोणाला करू नये याबाबत आचार्य चाणक्य यांनी मार्गदर्शन केले आहे. त्यानुसार असे काही लोकं आहेत ज्यांना मदत केल्याने तुम्ही स्वतः अडचणीत येऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया काय सांगते चाणक्य नीती. आचार्य चाणक्य नीती शास्त्रात काही लोकांपासून दूर राहत त्यांना मदत न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कारण या लोकांना मदत केल्याने मदत करणाऱ्यांच्या जीवनात खूप अडचणी निर्माण होतात.
Also Read:
दृष्ट महिला –
चाणक्य नीतीनुसार, दृष्ट महिलेची मदत करणे किंवा तिच्या संपर्कात राहणे घातक आहे. यामुळे तुमच्या आयुष्यात अडचणी निर्माण होतात, तुमचं आयुष्य खराब होते. त्यामुळे अशा महिलांपासून दूर राहावे.
मूर्ख व्यक्तीची मदत करणे –
मूर्ख व्यक्तींची मदत करणे किंवा त्यांना उपदेश देत चांगल्या मार्गवर चालण्याचा साल्ला देणे निर्थक आहे. कारण मूर्ख व्यक्ती ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतो. उलट त्याला मदत करून आपण अडचणीत सापडतो.
कायम निराश असलेली व्यक्ती –
जे लोक कायम निराश असतात अशांची मदत करणे अडचणीचे ठरू शकते. त्यांच्या सहवासात आल्याने तुम्ही देखील निराशावादी होता. एक प्रकारे तुम्ही स्वतःच प्रगतीचा मार्ग बंद करून घेता. त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहिले पाहिजे असे चाणक्य नीती सांगते.
आचार्य चाणक्य कूटनीती, राजकारण, अर्थशास्त्रातील प्रसिद्ध विचारवंत होते. आचार्य चाणक्य यांनी व्यक्तीच्या व्यवहारिक जीवनासंबंधी देखील काही गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या जीवनात यशस्वी होण्यासाठी व्यक्तीला फायद्याच्या ठरतात.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या