Top Recommended Stories

Chankya Niti: 'या' 5 गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही; जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीती

Chankya Niti: आचार्च चाणक्य यांच्या नीतिशास्त्रात (Chankya Strategies) मनुष्याच्या जीवनाशी निगडीत बऱ्याच गोष्टी संगण्यात आल्या आले. आजही या गोष्टी व्यक्तीला मार्गदर्शक ठरतात.

Published: March 29, 2022 11:18 AM IST

By India.com News Desk | Edited by Vikas Chavhan

Chankya Niti: 'या' 5 गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही; जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीती
Chanakya Niti
Chankya Niti: आचार्च चाणक्य यांच्या नीतिशास्त्रात (Chankya Strategies) मनुष्याच्या जीवनाशी निगडीत बऱ्याच गोष्टी सांगण्यात आल्या आले. आजही या गोष्टी व्यक्तीला मार्गदर्शक ठरतात. आचार्य चाणक्य (acharya chanakya) यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन (Chankya Tips) केल्यास व्यक्ती यशस्वी होत त्याला जीवनात मान-सन्मान मिळतो. यासह आचार्य चाणक्य यांनी अशा काही गोष्टी संगितल्या आहेत ज्या बदलणे अवघड आहे. या गोष्टी व्यक्तीच्या जन्मापूर्वीच नशिबात लिहिलेल्या असतात असे चाणक्य नीतीत म्हटले आहे. आज अशाच पाच गोष्टींबद्दल सांगणार आहोत जे चाणक्य नीतीत सांगण्यात आल्या आहेत.

मृत्यू

मृत्यू हे प्रत्येकाला अटळ आहे. जन्माला येणारा प्रत्येकजण मारणार आहे. व्यक्तीचं आयुष्य किती असणार हे आईच्या पोटातच लिहलेले असते असे चाणक्य नीती सांगते. मनुष्याची इच्छा असतानाही तो यात बदल करू शकत नाही. त्यामुळे मनुष्याने आयुष्यात चांगले कर्म करावे असा सल्ला चाणक्य नीतीत देण्यात आला आहे.

बुद्धिमत्ता

मनुष्य हा किती बुद्धिवान आहे, तो किती ज्ञानाचा अभ्यास करेल हे देखील नशिबात लिहिलेले आहे. नशिबात लिहिलेले हे तितकेच ज्ञान तुम्हाला मिळेल असे आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात म्हटले आहे.

वय

एखादी व्यक्ती किती आयुष्य जगेल हे त्याच्या जन्मा आधीच आईच्या पोटात लिहिलेले असते. त्यामुळे मी इतके वर्ष जागेला असा गैरसमज व्यक्तीने करू नये.

कर्म

व्यक्तीच्या जीवनात सुख-दुःख हे त्याच्या कर्मावर अवलंबून असते. कर्माचे फळ हे मागील जन्मावर अवलंबून असते. त्यामुळे गर्भावस्थेतच तुम्हाला तुमच्या कर्माचे काय फळ मिळणार हे लिहिलेले असते. त्यामुळे आयुष्यात नेहमी चांगले कर्म करावे असे सांगण्यात येते.

संपती

आईच्या पोटातच बाळाचे नाशिब लिहिले जाते. संपत्तीच्या बाबतीत देखील चाणक्य नीतीत सांगण्यात आले आहे. त्यानुसार आयुष्यात तुम्ही किती संपत्ती मिळविणार हे आधीच ठरलेले असते. कितीही मेहनत केली तरी नशिबापेक्षा जास्त पैसा तुम्ही कमवू शकत नाही. ही बाबा लक्षात घेत व्यक्तीने आहे, त्यात समाधानी राहत आयुष्य जगावे असे चाणक्य नीती सांगते.

(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. india.com याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)

You may like to read

Also Read:

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.

?>