Top Recommended Stories

Chocolate Day 2022: आज साजरा केला जातोय चॉकलेट डे, जाणून घ्या यामागचा इतिहास!

Chocolate Day 2022: तरुणाईमध्ये चॉकलेट डेची क्रेझ जास्त पाहायला मिळते. काही व्यक्ती असे असतात जे या दिवशी आपल्या पार्टनरला स्वत:च्या हाताने चॉकलेट तयार करतात.

Updated: February 9, 2022 8:35 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Valentine's Day 2022
Valentine's Day 2022

Chocolate Day 2022: रोज डे (Rose Day), प्रपोज डे (Propose Day) साजरा केल्यानंतर व्हेलेंटाईन वीकमध्ये (Valentine Week) येणारा तिसरा दिवस म्हणजे चॉकलेट डे (Chocolate Day). 9 फेब्रुवारीला चॉकलेट डे साजरा केला जातो. यादिवशी प्रेमीयुगुल एकमेकांना चॉकलेट गिफ्ट (Chocolate Gift) करतात आणि आपले प्रेम व्यक्त करतात. चॉकलेट डे पूर्वीच मार्कटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट मिळायला सुरुवात होते. तरुणाईमध्ये चॉकलेट डेची क्रेझ जास्त पाहायला मिळते. काही व्यक्ती असे असतात जे या दिवशी आपल्या पार्टनरला स्वत:च्या हाताने चॉकलेट तयार करतात. प्रेम व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. जर तुम्हाला गोड खाणं आवडत असेल आणि काही तरी खास आठवणी करायच्या असतील तर तुम्ही चॉकलेट डे साजरा करायला विसरु नका.

Also Read:

का साजरा केला जातो चॉकलेट डे

चॉकलेट डेला व्हेलेंटाईन वीकमधील सर्वात आवडता दिवस म्हणून साजरा केला जातो. 9 फेब्रुवारीला चॉकलेट डे साजरा केला जातो. यादिवशी प्रत्येक वयाच्या व्यक्ती एकमेकांना चॉकलेट देतात. चॉकलेट डेच्या दिवशी आपल्या पार्टनरला चॉकलेट देऊन तुम्ही नातं आणखी मजबूत करु शकता. चॉकलेट हा एक असा पदार्थ आहे जो कोणत्याही वयाच्या व्यक्तीला आवडतो. चॉकलेट आरोग्यासाठी खूपच फायदेशीर (Beneficial For Health) आहे. चॉकलेटमध्ये अँटीऑक्सिडेट गुणधर्म असतात. त्यामुळे चॉकलेट ब्लड फ्लो, हार्ट, स्किन यांच्यासाठी फायदेशीर मानले जाते. चॉकलेट खाल्ल्यामुळे मूड देखील चांगला होतो.

You may like to read

चॉकलेट डेचा इतिहास

सर्वात आधी अमेरिकेमध्ये चार हजार वर्षांपूर्वी कोकोचे झाड (Coco Tree) पाहिले गेले होते. अमेरिकेच्या जंगालात असलेल्या कोकोच्या बियांपासून चॉकलेट तयार केले गेले. जगात सर्वात आधी अमेरिका (America) आणि मॅक्सिकोमध्ये (Mexico) चॉकलेटचा प्रयोग करण्यात आला होता. असे सांगितले जाते की, 1528 मध्ये स्पेनच्या राजाने मॅक्सिकोवर कब्जा केला. या राजाला कोको खूप आवडत होते. त्यानंतर राजाने कोकोच्या बीया (Cocoa beans) मॅक्सिकोवरुन स्पेनला घेऊन गेला. त्यानंतर स्पेनमध्ये चॉकलेट खाण्यास सुरुवात झाली.

1829 मध्ये कॉनराड जोहान्स वान हॉटन नावाने कोको प्रेस नावाची मशीन तयार करण्यात आली. असे सांगितले जाते की, आधी चॉकलेटची चव तिखट होती. पण जोहान्सने जी मशीन तयार केली त्यामधून चॉकलेटचा तिखटपणा दूर करण्यात आला. 1848 मध्ये ब्रिटिश चॉकलेट कंपनी जे. एर फ्राई अॅण्ड सन्सने कोकोमध्ये बटर, दूध आणि साखर मिक्स करुन त्यापासून चॉकलेट तयार केले. अशापद्धतीने वेळेनुसार चॉकलेटच्या चवीमध्ये देखील बदल होत गेले.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 9, 2022 8:34 AM IST

Updated Date: February 9, 2022 8:35 AM IST