Clock Vastu Tips: घरात या दिशेला लावा घड्याळ, अन्यथा गरिभी कधीच नाही सोडणार साथ
Watch Vastu Tips: घरात या दिशेला लावा घड्याळ, अन्यथा गरिभी कधीच नाही सोडणार साथ
Watch Vastu Tips : माणसाच्या आयुष्यात वेळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वेळेनुसार चालणे, वेळेवर काम करणे आणि वेळ पाहून कोणतेही काम करणे ही प्रत्येकाची गरज आहे. असेही म्हणतात की जो वेळेला महत्तव देत नाही, वेळ त्याला साथ देत नाही.
Watch Vastu Tips : माणसाच्या आयुष्यात वेळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वेळेनुसार चालणे, वेळेवर काम करणे आणि वेळ पाहून कोणतेही काम करणे ही प्रत्येकाची गरज आहे. असेही म्हणतात की जो वेळेला महत्तव देत नाही, वेळ त्याला साथ देत नाही. वास्तुशास्त्रानुसार घड्याळ (clock) हे फक्त वेळ दर्शवणारे नसते तर घड्याळाचा माणसाच्या जीवनावर विशेष प्रभाव पडतो. घर किंवा ऑफिसमध्ये घड्याळ लावण्यापूर्वी त्याची योग्य दिशा (Right direction of clock) आणि वास्तूचे नियम जाणून घेणे खूप गरजेचे आहे. अशा स्थितीत घड्याळ कोणत्या दिशेला (Direction of clock) लावल्यास चांगले परिणाम मिळतात हे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे.
घड्याळ लावताना करताना लक्षात ठेवा दिशा
वास्तुशास्त्रानुसार (Vastushastra) ईशान्य (Northeast) दिशेच्या भिंतीवर घड्याळ लावणे शुभ असते. कारण पूर्व आणि उत्तर दिशांमध्ये सकारात्मक ऊर्जेचा (Positive energy) भरपूर संचार असतो. या दिशेला घड्याळ लावल्यास शुभ फळ प्राप्त होते आणि जीवनात प्रगती होते. पूर्व दिशेला घड्याळ लावल्याने घरात लक्ष्मीचे आगमन (Arrival of Lakshmi) होते. याशिवाय घरात राहणाऱ्या सदस्यांच्या मनात सकारात्मक विचार येतात. त्याचबरोबर घर किंवा ऑफिसच्या दक्षिण भिंतीवर घड्याळ लावू नये. कारण या दिशेला घड्याळ लावल्याने नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढू लागतो. त्यामुळे दक्षिण दिशेच्या भिंतीवर घड्याळ कधीही लावू नये.
You may like to read
दारावर घड्याळ लावू नका
घराच्या कोणत्याही दरवाजाच्या वर घड्याळ लावले असेल तर ते ताबडतोब काढून टाका. कारण घड्याळाच्या खालून जे काही जाते त्यावर नकारात्मक उर्जेचा सर्वात जास्त प्रभाव पडतो. याशिवाय घरातील कोणतेही घड्याळ बंद अवस्थेत पडलेले असेल किंवा खराब असेल तर तेही काढून टाकावे. खराब किंवा थांबलेल्या घड्याळाचे काटे नकारात्मक ऊर्जा दर्शवतात.
Trending Now
घरात बंद घड्याळं ठेवू नका
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये बंद घड्याळ ठेवल्याने गरिबी वाढते. तसेच मानवी जीवन थांपल्याच्या स्थितीत येते. त्याचबरोबर घर किंवा ऑफिसमध्ये लाल, काळ्या किंवा निळ्या रंगाचे घड्याळ वापरू नये. त्याऐवजी पिवळे, हिरवे किंवा फिकट तपकिरी रंगाचे घड्याळ लावणे शुभ असते.
(डिस्क्लेमर : येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. हे या विषयातील तज्ञांचे मत नाही)
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर
लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा
इतरही ताज्या बातम्या
RECOMMENDED STORIES
More Stories
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.