
Garlic Leaf Benefits: लसणाची पात अनेक आजारांवर रामबाण औषध, जाणून घ्या बेनिफिट्स
Clove benefits For Health : आपल्या स्वयंपाक घरामध्ये (Indian Kitchen) वापरण्यात येणाऱ्या सर्वच मसाल्याच्या पदार्थांचे वेगवेगळे गुणधर्म आहे. प्रत्येक पदार्थाचे स्वत:चे वेगळे असे वैशिष्ट्य आहे. असाच एक पदार्थ म्हणजे लवंग (Clove). लवंग दिसायला खूपच लहान असते पण लवंगमध्ये आढळणारे पोषक तत्व खूप आश्चर्यकारक आहेत. लवंगाच्या आत पाण्याबरोबरच प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम, तांबे, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई इत्यादी गुमधर्म आढळतात जे शरीरासाठी खूप फायदेशीर (Clove benefits) आहेत.
आरोग्यासाठी लवंग अत्यंत उपयुक्त आहेत. लवंग शरीरासाठी किती फायदेशीर आहे याबद्दल तुम्हाला माहिती नसेल पण त्याचे फायदे ऐकल्यानंतर तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल. आज आपण या लेखाच्या माध्यमातून लवंगाचे शरीरासाठी असणारे आश्चर्यकारक फायद्यांविषयी जाणून घेणार आहोत…
– फक्त एक लंवग चघळल्यास तोंडाचे आरोग्य चांगले राहण्यास उपयुक्त ठरते.
– लवंग तुम्हाला सर्दी आणि खोकला टाळण्यासाठी खूप मदत करू शकते. लवंगामध्ये आढळणारे दाहक-विरोधी गुणधर्म श्वसनसंस्था स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त आहेत.
– लवंग तुमची पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी खूप मदत करू शकते. याचे सेवन केल्याने पोट फुगणे, गॅस, अपचन आदी समस्यांपासूनही आराम मिळतो.
– लवंग वजन कमी करण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे. फक्त चयापचय वाढवण्यास मदत करत नाहीत तर वजन नियंत्रित करण्यास देखील मदत करतात.
– लवंगाच्या सेवनाने डोकेदुखी तर दूर होतेच पण कान आणि हाडांचे दुखणे दूर करण्यासाठीही लवंग खूप उपयुक्त आहे.
लवंगाची चव खूप गरम असते. पण उन्हाळ्यात लवंग मर्यादित प्रमाणात खाऊ शकतो. विशेषत: रात्री झोपण्यापूर्वी दोन लवंगा खाल्ल्यास झोप चांगली लागते आणि खोकलाही नियंत्रित ठेवता येतो.
कोणत्याही गोष्टीचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. अशा परिस्थितीत लवंगाचा अतिरेक देखील आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. अशा परिस्थितीत एखादी व्यक्ती एक किंवा दोन लवंगाचे सेवन करू शकते. अचूक माहिती मिळवण्यासाठी तज्ञांचा सल्ला जरूर घ्या.
जर तुम्ही लवंगाचे जास्त सेवन केले तर त्यामुळे त्वचेची ऍलर्जी तर होऊ शकतेच पण डोळ्यात जळजळ होणे, रक्त पातळ होणे, यकृत खराब होणे इत्यादी समस्या देखील होऊ शकतात.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या
Enroll for our free updates