मुंबई : आतापर्यंत दूध (Milk) किंवा दूध पावडरचा (Milk Powder) चहा तुम्ही प्यायला असेल. साधारणत: सर्वजण दूधाचाच चहा (Milk Tea) पितात. पण तुम्ही कधी नारळाच्या दुधाचा चहा (Coconut Milk Tea) प्यायला आहे का? नारळाच्या दुधाचा चहा म्हटल्यावर तुम्हाला थोडं आश्चर्यच वाटेल ना. पण हे खरं आहे नारळाच्या दूधाचा चहा असतो आणि तो खूपच आरोग्यदायी आहे. नारळाच्या दुधात मॅग्नेशियम (Magnesium), आयरन ( Iron), व्हिटॅमिन – सी (Vitamin – C), पोटॅशियम (Potassium) आणि फायबर (Fiber) असतात. हा चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आज आम्ही तुम्हाला नारळाच्या दुधाचा चहा कसा तयार करायचा आणि या चहाचे फायदे काय आहेत हे सांगणार आहोत….Also Read - Fennel Tea Benefits: पचनाच्या समस्येपासून त्रस्त असाल तर रोज प्या बडीशेपचा चहा, होतील अनेक आरोग्यदायी फायदे!

असा तयार करा नारळाच्या दुधाचा चहा –

– कोकोनट ग्रीन टी (Green Tea) तयार करण्यासाठी एका भांड्यात चार कप पाणी घ्या. पाण्याला उकळी येऊ द्या.
– या पाण्यामध्ये तीन ग्रीन टी बॅग टाका.
– या मध्ये 1/4 कप नारळाचे दूध (Coconut Milk) आणि दोन मोठो चमचे क्रीम (Cream) टाका.
– हा चहा व्यवस्थित हालवून त्यातून ग्रीन टी बॅग काढा
– यामध्ये तुम्ही एक चमचा ब्राऊन शुगर (Brown Sugar) देखील टाकू शकता. Also Read - Jeera Side Effects : सावधान! भाज्यांमध्ये तुम्हीही घालता का जिरे? दुष्परिणाम जाणून व्हाल चकित!

नारळाच्या दूधाच्या चहाचे फायदे –

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर –
नारळाच्या दुधाचा चहा वजन कमी करण्यासाठी खूपच फायदेशीर आहे. नारळामध्ये वजन वाढवणारे फॅट्स नष्ट करण्याचे गुणधर्म असतात. नारळामध्ये कॅलरीज कमी असतात आणि त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते. यामुळे ते वजन कमी करण्यासाठी खूपच फायदेशीर मानले जाते. Also Read - Meethache Kesasathi Fayade: सुंदर केसासाठी या 3 पद्धतीने करा मीठाचा वापर, चमकदार केसांसोबत होतील अनेक फायदे!

रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो –
काही तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, नारळाच्या दुधापासून तयार केलेला चहा प्यायल्याने रोग प्रतिकारकशक्ती वाढते. नारळामध्ये व्हिटॅमिन सी आढळते जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.

हृदयासाठी फायदेशीर –
नारळाचे सेवन किंवा त्याच्या दुधापासून तयार केलेला चहा प्यायल्याने कॉलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाबची समस्या दूर होते.