By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Coffee Side Effects: गरोदर महिलांनो घ्या काळजी, हिवाळ्यात कॉफीचे अतिसेवन घातकच!
कॉफीचे सेवन गर्भवती महिलांसाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे गर्भपाताचा धोका वाढतो. यासोबतच हे नवजात मातांसाठीही धोकादायक असते. कॅफीन दुधाद्वारे बाळाच्या शरीरात जाऊ शकते. यामुळे मुलांमध्ये झोपेची समस्या, चिडचिड आणि आतड्यांसंबंधी समस्या उद्भवू शकतात.

Coffee Side Effects: बहुतांश लोक हिवाळ्यात चहा-कॉफीचे सेवन (Coffee in Winter) मोठ्या प्रमाणात करू लागतात. काही लोक हिवाळ्यात कॉफी (Coffee) सेवनाला जास्त प्राधान्य देतात. कॉफीशिवाय काही लोकांचा दिवसही सुरू होत नाही. पण तुम्हाला हे माहित आहे का की हिवाळ्यात कॉफीचे जास्त सेवन करणे तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक (Coffee Side Effects) ठरू शकते.
हिवाळ्यात कॉफीचे जास्त सेवन केल्याने तुम्ही दीर्घकाळ आजारी राहू शकता. चला जाणून घेऊया हिवाळ्यात कॉफीच्या अतिसेवनाचे तोटे…
गर्भवती महिलांसाठी धोकादायक:
कॉफीचे सेवन गर्भवती महिलांसाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे गर्भपाताचा धोका वाढतो. यासोबतच हे नवजात मातांसाठीही धोकादायक असते. कॅफीन दुधाद्वारे बाळाच्या शरीरात जाऊ शकते. यामुळे मुलांमध्ये झोपेची समस्या, चिडचिड आणि आतड्यांसंबंधी समस्या उद्भवू शकतात.
Trending Now
ऑस्टियोपोरोसिसचा धोका:
कॉफीमध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते. कॅफिन हाडांमधून कॅल्शियम काढून टाकते त्यामुळे शरीरातील ताकद कमी होते. जर तुम्ही दररोज पुरेसे कॅल्शियम घेतले नाही आणि कॉफीचे सेवन केले नाही तर यामुळे संधिवात किंवा ऑस्टिओपोरोसिसची समस्या उद्भवू शकते.
हृदयविकाराचा धोका :
बरेच लोक फिल्टर न केलेल्या कॉफीचे सेवन करतात. यामुळे तुमच्या रक्तातील कोलेस्टेरॉल आणि फॅटचे प्रमाण वाढते आणि यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
मधुमेह:
अनेक संशोधनांनुसार कॅफिनमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही कॉफीचे सेवन सावधगिरीने करणे गरजेचे असते.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या