Top Recommended Stories

Cold Water Side effects: हिवाळ्यात तुम्हीही थंड पाणी पिता? उद्भवू शकतात या गंभीर समस्या

Cold Water Side effects : हिवाळ्यात तुम्ही थंड पाणी पित असाल तर ती सवय तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. थंड पाण्यामुळे आरोग्याबाबतच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. जाणून घ्या हिवाळ्यात थंड पाणी पिण्याचे दुष्परिणाम.

Updated: December 21, 2022 10:01 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

थंड पाणी आरोग्यासाठी हानिकारक
थंड पाणी आरोग्यासाठी हानिकारक

Cold Water Side effects : अनेकांना उन्हाळ्याप्रमाणे हिवाळ्यात देखील थंड पाणी पिण्याची सवय असते. मात्र हिवाळ्यात थंड पाणी प्यायल्याने आरोग्याला मोठी हानी (Cold Water In Winter) पोहोचू शकते. त्यामुळे या हंगामात थंड पाणी पिणे टाळावे (side effect of cold water) अन्यथा तुम्हाला त्याच्या दुष्परिणामांचा सामना करावा लागू शकतो. आजचा लेख याच विषयावर आहे. आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे एखाद्या व्यक्तीने हिवाळ्यात थंड पाणी प्यायले तर त्यामुळे आरोग्याला (Health Tips) काय नुकसान होऊ शकते हे सांगणार आहोत.

हिवाळ्यात थंड पाणी प्यायल्याने होतात हे नुकसान

वजन कमी करणाऱ्यांसाठी हानिकारक : तुम्ही खूप थंड पाणी पितात तेव्हा शरीरातील चरबी जाळणे कठीण होते. थंड पाण्यामुळे शरीरातील चरबी जड होते, त्यामुळे चरबी जाळण्यात अडचण येते. वजन कमी करणाऱ्यांनी थंड पाणी पिणे टाळावे.

You may like to read

सर्दी-खोकल्याचा त्रास : हिवाळ्यात थंड पाणी प्यायले तर सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ शकतो. सर्दी-खोकल्याच्या समस्यांमुळे छातीत श्लेष्मा जमा होतो आणि डोकेदुखीची समस्या वाढते. त्यामुळे हिवाळ्यात थंड पाणी पिणे टाळावे.

घशाला इजा होऊ शकते : हिवाळ्यात थंड पाणी प्यायले तर ते घशाला देखील इजा करू शकते. एर ही समस्या आधीच असेल तर थंड पाण्यामुळे ती आणखी वाढू शकते. ही समस्या खूप त्रासदायक ठरू शकते.

हृदय गती वाढण्याचा धोका : जास्त थंड पाणी प्यायल्याने पचनसंस्थेवर परिणाम होतो. थंड पाण्यामुळे हृदयाची गती वाढण्याचा धोका असतोतसेच पचन क्रिया मंदावते.

पचनसंस्था बिघडते : जास्त थंड पाणी प्यायल्याने पचनसंस्थेवर परिणाम होतो. त्यामुळे अन्न पचायला त्रास होऊ शकतो, बद्धकोष्ठता, पोटदुखी, मळमळ, पोट फुगणे यासारख्या समस्याही उद्भवू शकतात.

शरीराचे तापमान प्रभावित होते : हिवाळ्यात थंड पाण्याचे सेवन केले तर शरीराचे तापमान देखील वर-खाली होऊ शकते. त्यामुळे उर्जेची पातळी देखील प्रभावित होऊ शकते. अशा परिस्थितीत रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेले पाणी पिणे टाळावे.

वजन कमी करणाऱ्यांसाठी हानिकारक : जेव्हा तुम्ही खूप थंड पाणी पिता तेव्हा शरीरातील चरबी जाळणे कठीण होते. थंड पाण्यामुळे शरीरातील चरबी जड होते, त्यामुळे चरबी जाळण्यात अडचण येते. वजन कमी करणाऱ्यांनी थंड पाणी फार मर्यादित प्रमाणात पिऊ नये.

(टीप : लेखात दिलेला सल्ला ही सामान्य आणि उपलब्ध माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा)

Also Read:

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.