मुंबई : अनियमित दिनचर्या आणि अन्नामुळे आजकाल बद्धकोष्ठतेची समस्या (Constipation Home Remedies) सामान्य झाली आहे. आजच्या काळात बरेज लोक बद्धकोष्ठतेच्या समस्येचा सामना करत आहेत. बद्धकोष्ठतेमुळे शरीरात अनेक आजार उद्भवू लागतात. आपणही बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रस्त असाल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी आम्ही काही घरगुती उपाय (Constipation Home Remedies) सांगत आहोत.Also Read - हनुमानाचा श्रृंगार करताना करू नका 'ही' चूक; लाभ तर दूरच नुकसानच जास्त होईल!

बद्धकोष्ठता होण्याचे मुख्य कारण

  • पाणी कमी प्यायल्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते.
  • तेलकट आणि मसाल्यांच्या पदार्थांचं सेवन केल्याने बद्धकोष्ठतेला आमंत्रण मिळते. यामुळं पोटाचे इतरही आजार उद्धभवतात.
  • सतत एकाच ठिकाणी बसून राहिल्याने बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते. कार्यालयात काम करणाऱ्या लोकांना याचा जास्त त्रास होतो
  • वजन कमी करण्यासाठी कमी खाणे हे देखील बद्धकोष्ठतेचे कारण आहे. त्यामुळे संतुलित प्रमाणात आहार घेणे आवश्यक आहे.
  • पोट दुखी होत असेल तर पेन किलर टॅबलेट घेणे टाळा. पेन किलरचा जास्त वापर करणे आरोग्यासाठी योग्य नाही.

घरगुती उपाय

नारळ तेल : नारळ तेलाचे सेवन केल्यास बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. यासाठी एक ग्लास दूधामध्ये एक चमचा नारळाचं तेल घाला आणि ते प्या. यामुळे तुम्हाला आराम मिळेल. Also Read - Back Pain in Pregnancy: प्रेग्नेंसीत पाठदुखी ठरते सर्वाधिक त्रासदायक, जाणून घ्या रामबाण उपाय

आल्याचा चहा: आल्याचा चहा पिल्याने देखील बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एक कप आल्याचा चहा बनवा आणि त्यात दोन चमचे एरंडेल तेल मिसळा आणि त्याचे सेवन करा. Also Read - Mosquito Bites Home Remedies: डास चावल्यानंतर करा हे घरगुती उपाय; सूज, जळजळीपासून मिळेल आराम

मध : मध बद्धकोष्ठतेसाठी खूप फायदेशीर असतो. रात्री झोपण्यापूर्वी एका ग्लास पाण्यात एक चमचा मध मिसळून प्या. याचे नियमित सेवन केल्यास बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

मनुके : मनुके काही काळ पाण्यात भिजवून ठेवल्यानंतर त्याचे सेवन केल्यास बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. याशिवाय अंजीरचेही रात्रभर पाण्यात भिजल्यानंतर सेवन केल्यास बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

पालक : आपल्या आहारात नेहमी पालकचा समावेश असावा. पालकाची भाजी खाणे किंवा पालकाचं सूफ पिणे आरोग्यासाठी चांगले असते. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या देखील दूर होते.