मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक कारणांनी माणसांची सेक्स लाईफ (sex life) विस्कळीत आणि निराशाजनक झाली आहे. कामाचं टेन्शन, थकवा, झोप कमी होणे, योग्य आहार न मिळणे अशा अनेक कारणांनी अनेकांमध्ये सेक्सबद्दल निराशा वाढल्याचं दिसून येतं. यामुळेच उत्साह वाढवण्यासाठी अनेक औषधांचा वापर केला जातो. अनेक लोक सेक्स लाईफ आणखी आनंदी करण्यासाठी आणि त्यात कमी झालेला इंटरेस्ट वाढवण्यासाठी आयुर्वेदिक औषधांच्या शोधात असतात असे निदर्शनास आले आहे. मात्र, टरबूज (Benefits of Watermelon) देखील सेक्स लाईफ आनंदी करण्यासाठी एक उत्तम उपाय आहे.Also Read - Tarbuj khanyache fayde : सेक्स लाईफ आनंददायी बनवते टरबूज, जाणून घ्या चमत्कारिक फायदे

डाळिंबाचा रस हा ‘व्हायग्रा’सारखेच काम करू शकतो हे अलिकडेच सिद्ध झालेले आहे. डाळिंबाच्या रसासारखाच परिणाम आता टरबूज (कलिंगड) सुद्धा करू शकते (Water Melon will raise your sex stamina) असे एका संशोधनातून समोर आले आहे. टरबूज सर्वांना माहिती आहे. टरबूज थंड असतं, त्यात पाण्याचे प्रमाण अधिक असते. उन्हाळ्यात भरपूर टरबूज खाण्याचा सल्ला (Consume watermelon to make sex life happier) डॉक्टर देखील देतात. मात्र, आता या फळाचा उपयोग चांगल्या सेक्स लाईफसाठी देखील होऊ शकतो, असे एका संशोधनातून समोर आले आहे. Also Read - Water Melon Face Pack: ग्लोइंग स्किनसाठी चेहऱ्याला लावा कलिंगडाचा फेसपॅक, कसा करायचा वापर घ्या जाणून!

भारतीय वंशाच्या एका संशोधकाने अमेरिकेत केलेल्या एका संशोधनात असे समोर आले आहे की, टरबूज हे व्हायग्रा सारखे काम उपयोगी असते. सेक्ससाठीची ईच्छाशक्ती वाढवण्याचे काम टरबूज करू शकते. कलिंगडमधील घटक रक्तपेशींवर व्हायग्रासारखेच परिणाम करतात, असे या अभ्यासातून निदर्शनास आले आहे. Also Read - काय सांगता! कोणतीच पत्नी तिच्या नवऱ्याला सांगत नाही आयुष्यातील 'हे' 5 सिक्रेट

‘टेक्सास एअँड एमच्या फ्रुट अँड व्हे‍‍जिटेबल इम्प्रुव्हमेंट सेंटर’चे संचालक डॉ. भीमनगौडा पाटील यांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी सांगितले की “कलिंगड हे साधारण फळ नाही. त्यात शरीराच्या दृष्टीने अतिशय प्रभावशाली नैसर्गिक घटक आहेत. त्यात 92 टक्के पाणी असतं आणि कॅलरीज शून्य टक्के असतात. त्याच्या फायद्याची यादी बरीच मोठी आहे. त्यापैकी सर्वात मोठा लाभ लैंगिक क्षमता वाढवण्याचा आहे”.

तुमच्या सेक्स लाईफमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर काळजी करायची आणि त्यासाठी महागड्या ट्रिटमेंट देखील घेण्याची गरज नाही. केवळ टरबूजचे सेवन करून तुम्ही तुमची सेक्स लाईफ आनंदी बनवू शकता. शिवाय टरबूज बाजारात सहज उपलब्ध होते त्यामुळे ते तुमच्या जास्त उपयोगी पडू शकते.