मुंबई: दही (Curd) आरोग्यासाठी खूप उपयुक्त असते. दही कॅल्शियमने भरपूर असते जे हाडांसाठी खूप फायदेशीर ठरते. नियमित दहीचे सेवन केल्यास कोलेस्टेरॉल आणि उच्च रक्तदाब कमी होण्यास देखील मदत होते. परंतु काही लोकांसाठी दहीचे सेवन खूप हानिकारक (Curd Side Effects) ठरू शकते. दररोज गरजेपेक्षा जास्त प्रमाणात दहीचे सेवन देखील आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. जाणून घेऊयात कोणत्या लोकांनी दही खाऊ नये…(Curd Side Effects: If you have these problems do not eat Curd, avoid Consumption of yoghurt If you have these problems)

सांधेदुखीच्या रुग्णांसाठी हानिकारक : दहीचे सेवन हाडं आणि दातांसाठी चांगलं मानलं जातं. मात्र सांधेदुखीच्या रुग्णांसाठी दहीचं सेवन चांगलं मानलं जात नाही. संधिवाताची समस्या असलेल्या रुग्णांनी नियमितपणे दही खाणं टाळावं. या रुग्णांनी अधिक प्रमाणात दीचे सेवन केल्यास वेदनांची समस्या आणखी वाढू शकते.

श्वसनाची समस्या : तुम्हाला श्वसनाची समस्या असेल तर दही खाणे टाळावे. तुम्हाला जर दही खायचेच असेल तर दिवसा दहीचे सेवन करावे. रात्री अजिबात दही खाऊ नये.

लॅक्टोज इनटॉलरेन्स : ज्यांना जास्त प्रमाणात लॅक्टोज इनटॉलरेन्सची समस्या आहे त्यांनी दहीचे सेवन करणे टाळावे. अशा लोकांनी दही खाल्ल्यास त्यांना अतिसार आणि पोटात दुखण्याची समस्या उद्भवू शकतात.

अॅसिडिटी : ज्यांना अतप्रमाणात अॅसिडिटीची समस्या आहे त्यांनी दही अजिबात खाऊ नये. विशेषत: यांनी रात्रीच्या वेली दही अजिबात खाऊ नये. (Curd Side Effects: If you have these problems do not eat Curd, avoid Consumption of yoghurt If you have these problems)