Dahi Vada Recipe: उन्हाळ्यात घरीच बनवा चवदार दही वडा चाट, 20 मिनिटांत तयार होईल टेस्टी डिश
Dahi Vada Recipe: उन्हाळ्यात गर्मीपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक जण दह्यापासून बनलेले पदार्थांचे सेवन करतात. दह्याचा गुणधर्म थंड असतो. त्यामुळे दह्यापासून बनवला जाणाऱ्या दही वडा चाट या टेस्टी पदार्थाची रेसिपी आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या रेसिपीच्या मदतीने तुम्ही घरीच अतिशय चविष्ट दही वडा बनवू शकता.

Dahi Vada Recipe: उन्हाळा ऋतू सुरु झाला की आपल्याकडे उन्हाळ्यातील खास पदार्थांची रेलचेल सुरु होते. थंड आईस्क्रीम, कुल्फी आणि दह्यापासून बनलेले पदार्थ (summer food) हे उन्हाळ्यात विशेष आवडीने खाल्ले जातात. दह्याचा (curd) गुणधर्म थंड असतो. त्यामुळे उन्हाळ्यात शरीर थंड राहावे आणि आपल्याला फ्रेश वाटत राहावे यासाठी लोक दही आणि दह्यापासून बनलेले वेगवेगळे पदार्थ (foods made from curd) खात असतात. आज आम्ही तुम्हाला दह्यापासून बनणाऱ्या एका पदार्थबद्दल माहिती देणार आहोत. तो पदार्थ म्हणजे दही वडा चाट. दही वडा चाट (Dahi Vada Chaat) खायला एकदम रुचकर आणि स्वादिष्ट असते. मात्र त्याचबरोबर याची चटपटीत चव (curd food) तुमच्या आरोग्यासाठी देखील चांगली असते. त्यामुळे आज आम्ही (spicy taste) तुम्हाला सांगणार आहोत की दही वडा चाट कसे बनवतात .
Also Read:
दही वडा चाट बनवण्यासाठी लागणारे साहित्य
दही वडा चाट बनवण्यासाठी तुम्हाला भिजवलेली मुगडाळ, तळण्यासाठी तेल, अर्धा कप दही, चिंचेची चटनी, कोथिंबिरीची हिरवी चटनी, पपडी, चाट मसाला, एक बारीक चिरलेला कांदा, किसलेले गाजर, शेंगदाणे, कोथिंबीर, खरी बुंदी आणि शेव या साहित्याची आवश्यकता आहे.
दही वडा चाट बनवण्याची कृती
- सर्वप्रथम भिजवलेली मुगडाळ वाटून घ्या. त्यानंतर त्याचे गोल गोल वडे बनवून ते तेलात तळून घ्या.
- यानंतर ते तळलेले वडे पाण्यात टाकून ते भिजवा.
- नंतर वड्यातून जास्तीचे पाणी कमी करून एका प्लेटमध्ये हे वडे आणि पपडी घ्या.
- त्यानंतर वड्यांवर दही, खजूर आणि चिंचेची चटनी, कोथिंबिरीची हिरवी चटनी, किसलेले गाजर, चाट मसाला, जिरे पूड, बारीक चिरलेला कांदा हे सर्व साहित्य टाका.
- त्यानंतर गार्निशिंगसाठी कोथिंबीर, खारी बुंदी आणि शेव टाका. तुम्ही या दही वडा चाटसोबत चिंचेची चटणी आणि कोथिंबिरीची हिरवी चटणी वेगळी देऊ शकता.
- तसेच आणखी चव वाढवण्यासाठी त्यासोबत दही देखील देऊ शकता.