मुंबई : दहीचं (dahi) सेवन आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते. दहीचं सेवन केल्याने शरीराला अनेक प्रकारचे लाभ होतात. दहीचं सेवन अनेक प्रकारे केलं जातं. दही पराठे, रायता आणि ताक अशा वेगवेगळ्या प्रकारांमधून तुम्ही दह्याचे सेवन करू शकता. दहीमध्ये अनेक पोषक घटक असतात. हे घटक आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त असतात. विशेषत: उन्हाळ्यात दही हे पोटासाठी रामबाण उपाय म्हणून काम करतं. मात्र, तुम्हाला माहिती आहे का की विशिष्ट पदार्थांसोबत दहीचं सेवन करू नये (dahi should not be consumed with certain foods). काही पदार्थांसोबत दहीचं सेवन केल्यास शरीराला नुकसान होऊ शकतं.

दही अतिशय उपयुक्त

दहीमध्ये प्रोबायोटिक्स असतात. दहीमध्ये असलेले सूक्ष्मजीव आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतात. दही अँटिऑक्सिडेंट म्हणून देखील काम करतं. दह्यामुळं रोगप्रतिकार शक्ती वाढते. दही पचनसंस्थेसाठी देखील महत्वाचं असतं. दरी खाल्ल्याने शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होत नाही. दहीमुळं पोट निरोगी राहतं आणि पचनक्रिया देखील उत्तम होते.

दहीमध्ये असतात हे घटक

दहीमध्ये व्हिटॅमिन बी -2, व्हिटॅमिन बी -12, फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम इत्यादी असतात. यामुळं आपले दात आणि हाडं मजबूत होतात. तसंच दही संधिवात प्रतिबंधित करतं. म्हणून दररोज दहीचं सेवन करणं आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतं.

या पदार्थांसोबत करून नका दहीचं सेवन

मासे: दहीसह माशांचे सेवन निषिद्ध मानलं जातं. आयुर्वेदातही याचा उल्लेख आहे. त्यामुळं मासे खाताना दहीचं सेवन करू नये. आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीकोनातून पाहिलं तर या मागचं कारण असं की, मासे आणि दही हे दोन्ही प्रोटीनचे उत्तम स्रोत आहेत. एवढे प्रोटीन खाल्ल्याने त्वचेशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. पोट खराब होऊ शकतं.

तेलकट पदार्थ: दहीचं सेवन केल्यानंतर जास्त तेलकट पदार्थ खाऊ नये. यामुळं पचनक्रिया खराब होते.

दुध : दहीचं सेवन केल्यानंतर किंवा आधी काही मिनिटे दुधाचं सेवन करू नये. यामुळं बद्धकोष्ठता, अतिसार या सारख्या समस्या उद्भवू शकतात.

लिंबूवर्गीय फळं : दहीसोबत लिंबूवर्गीय फळांचं सेवन करू नये. यामुळं शरीराची पचनसंस्था खराब होते.

आंबा : आंबा खाल्यानंतर किंवा आंब्यासोबत दहीचं सेवन केल्यास ते अतिशय नुकसानदायक ठरू शकतं. यामुळं त्वचे संबंधीत अॅलर्जी देखील होऊ शकते.