मेष: (Aries Horoscope)

मेष राशीचे लोक जे काम पूर्ण मन लावून करतील त्याचे त्यांना सकारात्मक परिणाम मिळू शकतात. जे लोक पाल्यांच्या प्रवेशासंबंधीत अडचणींचा सामना करत आहेत त्यांना आज चांगली बातमी मिळू शकते.Also Read - Daily Rashi Bhavishya in Marathi Today 28 Sep 2021: या राशीच्या लोकांनी आयुष्यात निर्णायक पावले उचलण्यास तयार राहावे; जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

वृषभ: (Taurus Horoscope)

भाग्य आज वृषभ राशीच्या लोकांना 90 टक्के साथ देण्याची शक्यता आहे. यांनी बुद्धीचा वापर केल्यास अनेक दिवसांपासून सामना करावा लागत असलेल्या समस्यांचे निराकरण करण्यात यांना यश येऊ शकते. Also Read - Daily Rashi Bhavishya in Marathi Today 27 Sep 2021: या राशीच्या लोकांना भोगावे लागू शकते भूतकाळातील कर्मांचे फळ; काय सांगतं तुमचं राशिभविष्य?

मिथुन: (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांनी आज नियोजनबद्धरित्या काम करण्याची गरज आहे. आज दररोजची दिनचर्या सुरु करण्याआधी यांनी काही बाबी सूचीबद्ध केल्यास त्याचा चांगला उपयोग होऊ शकेल. Also Read - Daily Rashi Bhavishya in Marathi Today 26 Sep 2021: कन्या राशीच्या लोकांना नवीन संधी मिळण्याची शक्यता; जाणून घ्या तुमचं आजचं राशिभविष्य

कर्क: (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांची मदत करण्यासाठी आज मित्र आणि सहकारी उत्सुक असू शकतात. मात्र त्यांनी खूप आवश्यकता असल्यासच मदत घ्यावी. इतरांवर पूर्ण विश्वास ठेवल्यास नुकसानीचा सामना करावा लागू शकतो.

सिंह: (Leo Horoscope)

सिंह राशीचे लोक आपल्या करियरची दिशा बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी असे कोणतेही पाउल उचलण्याआधी थोटी वाट पाहावी. यांनी सर्वात आधी कुटुंबातील ज्येष्ट व्यक्ती किंवा जोडीदाराचा सल्ला घ्यावा.

कन्या: (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या ज्या लोकांनी आधी विचार करून गुंतवणून केली आहे, त्यांना आज बहुप्रतिक्षित पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. आज नशीबाची साथ केवळ 56 टक्के मिळू शकते. त्यामुळे या राशीच्या लोकांनी नोकरी किंवा व्यवसायात सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

तूळ: (Libra Horoscope)

तूळ राशीचे लोक आज एखाद्या नव्या प्रोजेक्टकडे आकर्षित होऊ शकतात आणि योग्य दिशेने प्रयत्न करण्यास सुरूवात करू शकतात. या उद्देशासाठी कर्ज घेण्यास कोणतीही अडचण येणार नाही.

वृश्चिक: (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीचे जे लोक नेहमी इतरांची मदत करतात. आज त्यांना त्या बदल्यात इतरांकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. त्यांनी आपल्या मार्गात आलेल्या प्रत्येक संधीचं निष्पक्ष राहून विश्लेषण करावं.

धनु: (Sagittarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांना ते योजना आखत असलेल्या एखाद्या मोठ्या प्रोजेक्टसाठी मित्रांचे सहकार्य मिळू शकते. जर कोणी लॉन्ग ड्राइव्हवर जाण्याची इच्छा व्यक्त केली तर यांनी जरूर जावे. कारण असे केल्याने यांना थोडी शांती मिळू शकते.

मकर: (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी आज दुपारी 12 वाजेनंतरचा दिवस अतिशय व्यस्त असू शकेल. हे लोक उशीरा उठणे आणि तयार होण्यासाठी पूर्ण वेळ घेण्याचा आज आनंद घेऊ शकतील.

कुंभ: (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांनी एखाद्या गोष्टीवरून अतिउत्साहित होणे टाळावे. अन्यथा त्यांच्या पदरात निराशा पडू शकते. काही लोकांना मूड स्विगचा सामना करावा लागू शकतो.

मीन: (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लोकांची मानसिक स्थिती आज दिवसभर तणावपूर्ण राहील. जे लोक कुटूंबासोबत आपल्या प्रेमविवाहाच्या विषयावर चर्चा करू इच्छित आहे, त्यांच्यासाठी आजचा दिवस अडचण निर्माण करणारा असू शकेल.