मेष: (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांना आधी केलेल्या अथक परिश्रमाचं फळ मिळणार आहे. नोकरीच्या ठिकाणच्या समस्या सुटण्याची शक्यता आहे. नशीबाची साथ लाभेल, पण कोणतीही गोष्ट हलक्यात घेऊ नका. जोखिम स्विकारण्याची तयारी ठेवावी लागेल.Also Read - Daily Rashi Bhavishya in Marathi Today 28 Sep 2021: या राशीच्या लोकांनी आयुष्यात निर्णायक पावले उचलण्यास तयार राहावे; जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

वृषभ: (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांना पार्ट टाईम नोकरीची उत्तम संधी चालून येईल. चांगला पैसा कमावू शकतात. मात्र, वेळेचं नियोजन करताना मोठी कसरत करावी लागेल. व्यस्त दिनचर्येतून स्वत: साठी देखील वेळ काढावा लागेल. Also Read - Daily Rashi Bhavishya in Marathi Today 27 Sep 2021: या राशीच्या लोकांना भोगावे लागू शकते भूतकाळातील कर्मांचे फळ; काय सांगतं तुमचं राशिभविष्य?

मिथुन: (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांना आज खर्चावर नियंत्रण ठेवण्यात यश मिळेल. बचत करण्याचा विचार मनात येईल. अनेक पर्याय उपलब्ध होतील. नशीबाची 80 टक्के साथ लाभेल. विद्यार्थ्यांना नव्या संधी मिळतील. Also Read - Daily Rashi Bhavishya in Marathi Today 26 Sep 2021: कन्या राशीच्या लोकांना नवीन संधी मिळण्याची शक्यता; जाणून घ्या तुमचं आजचं राशिभविष्य

कर्क: (Cancer Horoscope)

कर्क राशीचे लोक कुटुंबीयांसोबत घरात शुभकार्याचं आयोजन करण्यावर चर्चा करू शकतात. व्यवसायासंबंधीत प्रवास करणाऱ्यांना सकारात्मक परिणाम जाणवतील.

सिंह: (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांकडे आज पाहुणे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरात आनंदी वातावरण राहिल. काही लोकांना नोकरीच्या ठिकाणी अनपेक्षीत पदोन्नती मिळू शकते.

कन्या: (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांचा वीकेंडचा पहिला दिवस देखील कामातच जाईल. बहुतांश वेळ क्लाइंट कॉलमध्ये जाईल. जोडीदाराला पुरेसा वेळ द्यावा लागेल. अन्यथा वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तूळ: (Libra Horoscope)

तूळ राशीचे लोक आपल्या घरासाठी आवश्यक वस्तु खरेदी करण्याचा प्लान करू शकतात. खरेदीत जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारात जाण्याआधीच यादी तयार करून घ्या.

वृश्चिक: (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीचे लोक आपली जीवन शैलीमध्ये आणखी सुधारणा करण्याचा प्रयत्न करतील. कौटुंबिक सहकार्य मिळेल. परंतु खोट्या प्रशंसेच्या मोहात अडकू नका.

धनु: (Sagittarius Horoscope)

जीवनात एक उंची गाठण्यासाठी धनु राशीच्या लोकांनी खूप परिश्रम घ्यावे लागेल. भाऊ-बहिनींचं सहकार्य कायम मिळत राहिल्याचा अभिमान वाटेल. उज्ज्वल भविष्यासाठी कुटुंबीयांकडून मोलाचं पाठबळ मिळेल.

मकर: (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. विवाहाच्या प्रतिक्षेत असलेल्यांचे विवाह जुळतील. रियल एस्टेटमध्ये पैसा गुंतवण्याची संधी मिळेल. पण एकदम कोणावर विश्वास ठेवू नका.

कुंभ: (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांना संयमानं घ्यावं लागणार आहे. आई-वडिलांसोबत वाद होण्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. शांत डोक्यानं घ्यावं लागेल. एखाद्या मुद्दा आई-वडिलांना समजावू सांगावा लागेल.

मीन: (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लोकांना व्यावसायिक चिंता सतावेल. गेल्या काही महिन्यांपासून व्यवसायात मंदीचं वातावरण आहे. आळस दूर करावा लागेल. उत्पन्न कसं वाढेल याचा विचार करावा लागेल.