आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल, हे जाणून घ्या पंडित जगन्नाथ गुरुजींकडून…Also Read - Daily Rashi Bhavishya in Marathi Today 22 Sep 2021: तूळ राशीच्या लोकांनी आज तोल सुटू देऊ नये; जाणून घ्या काय सांगतं तुमचं आजचं राशीभविष्य

मेष: (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांच्या मित्रासोबत अनेक दिवासांपासून सुरू असलेल्या मतभेदामुळं घरात कुटुंबातील सदस्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी गोष्टी सुरळीत होतील मात्र नातेसंबंध नाजूकपणे हाताळण्याची गरज आहे. Also Read - Daily Rashi Bhavishya in Marathi Today 21 Sep 2021: कन्या राशीच्या लोकांनी आरोग्य आणि पैशाबाबत सावध राहणे आवश्यक; जाणून घ्या तुमचं राशिभविष्य

वृषभ: (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांना अपोजिट जेंडरकडून नवं आणि विश्वासार्ह समर्थन मिळेल. जास्त विचार करण टाळावं त्यामुळे डोकेदुखी वाढू शकते. बाईक राईडींग किंवा पोहण्यासाठी जाण्याची कल्पना चांगली ठरू शकते. Also Read - Daily Rashi Bhavishya in Marathi Today 20 Sep 2021: वृषभ राशिच्या लोकांना अनपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता; जाणून घ्या तुमचं राशिभविष्य

मिथुन: (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांनी अनावश्यक शंका किंवा वादविवाद टाळण्याचा प्रयत्न करावा. असे करण्यास अयशस्वी झाल्यास या लोकांना ऊर्जा आणि पैशांच्या हानीचा सामना करावा लागू शकतो.

कर्क: (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांना आजच्या दिवशी नशीब 90 टक्के साथ देऊ शकते. सर्व योजनांमध्ये अपेक्षेप्रमाणे प्रगती होण्याची शक्यता आहे. या लोकांची आज एखाद्या सेलिब्रिटीशी भेट होऊ शकते.

सिंह: (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या मित्रांसह प्रतिस्पर्ध्यांचाही पाठिंबा मिळू शकतो कारण ते काहीतरी मोठं कार्य हाती घेण्यास पुढाकार घेतील. या लोकांना आज आर्थिक लाभा होण्याची शक्यता आहे.

कन्या: (Virgo Horoscope)

कन्या राशीचे लोक अनेक दिवसांपासून विचारात असलेला महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्याचा विचार करू शकतात. सुरुवातीला अडथळा येऊ शकतो परंतु यांनी जास्त काळजी करण्याची गरज नाही.

तूळ: (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांच्या सांघिक कार्यचे कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून कौतुक होऊ शकते. दीर्घ काळापासून प्रलंबित असलेली कायदेशीर लढाई एखाद्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे संपू शकते.

वृश्चिक: (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांना काही लोकांकडून प्रेरणा मिळू शकते. ही भावना त्यांना आनंदीत करण्याची शक्यता आहे. यांनी आज आज योग्य आहार घ्यावा.

धनु: (Sagittarius Horoscope)

धनु राशीचे लोक सायंकाळी मित्रांसोबत बाहेर फिरायला जाण्याची शक्यता आहे. हे लोक दिवसभर उत्साही आणि उर्जावान राहतील शिवाय दिवसभरात त्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागणार नाही.

मकर: (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांनी कोणत्याही व्यवसायिक व्यवहारापूर्वी पूर्ण संशोधन आणि चौकशी करणे लाभाचे ठरेल. बराच वेळ फोनवर बोलल्याने मान दुखण्याची शक्यता आहे.

कुंभ: (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांनी अर्थसंबंधीत सर्व कामे आजच पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. कारण त्यांना नजीकच्या काळात यासाठी वेळ मिळण्याची शक्यता कमी आहे. काही लोकांना कामासंदर्भात विदेशात प्रवास करावा लागू शकतो.

मीन: (Pisces Horoscope)

मीन राशीचे लोक सकाळी ध्यानसाधना आणि योगा केल्याने दिवसभर सक्रिय राहू शकतात. भावंडांसोबत व्यवसाय करण्याची योजना आखत असलेले लोक त्यासंदर्भात पुढचे पाऊल टाकू शकतात.