मेष: (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांना पुढील काही दिवस अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे स्वभाव चिडचिडा होऊ शकतो. परंतु संयम ठेवावा लागेल. जीवन आहे चढउतार येणारच.Also Read - Daily Rashi Bhavishya in Marathi Today 21 Sep 2021: कन्या राशीच्या लोकांनी आरोग्य आणि पैशाबाबत सावध राहणे आवश्यक; जाणून घ्या तुमचं राशिभविष्य

वृषभ: (Taurus Horoscope)

आपल्या मुलांसाठी उच्चशिक्षण देऊ इच्छीत पालकांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. उद्योग-व्यवसायासाठी मित्रांकडून आर्थिक पाठबळ मिळण्याची शक्यता आहे. Also Read - Daily Rashi Bhavishya in Marathi Today 20 Sep 2021: वृषभ राशिच्या लोकांना अनपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता; जाणून घ्या तुमचं राशिभविष्य

मिथुन: (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांना आपलं काम पूर्ण करण्यासाठी कोणावर अवलंबून राहू नये. जबाबदाऱ्या वाढल्या असल्या तरी भविष्यात सकारात्मक फळ मिळेल. Also Read - Daily Rashi Bhavishya in Marathi Today 19 Sep 2021: या राशीच्या लोकांना दुभंगलेल्या मनस्थितीतून सापडेल मार्ग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य

कर्क: (Cancer Horoscope)

कर्क राशीचे लोकांना आज पार्टटाईम जॉब मिळण्याची शक्यता आहे. कामात पारदर्शकता ठेवावी लागेल. नोकरीतील एखाद्या प्रोजेक्टवर फोकस करावं लागेल.

सिंह: (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांना आज सतर्क राहावं लागेल. शत्रू तुमच्याविरोधात कट रचत आहेत. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही काम मुलांच्या मदतीनं पूर्ण कराल.

कन्या: (Virgo Horoscope)

जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत, त्यांच्यासाठी उत्तम दिवस आहे. जोडीदारासाठी लॉन्ग आउटिंग किंवा कँडललाइट डिनर प्लान करू शकतात.

तूळ: (Libra Horoscope)

तूळ राशीच्या काही लोकांच्या आईच्या माहेरी वाद होण्याची शक्यता आहे. बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. नातेसंबंध खराब होऊ शकतात.

वृश्चिक: (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांना सामाजिक कार्यासाठी खर्च करावा लागेल. मात्र, आपलं करियर किंवा व्यवसायााबाबत चिंता सतावणार नाही. काळजी करू नका.

धनु: (Sagittarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांना आपल्या उद्योग-व्यवसायासाठी दीर्घ कालावधीसाठी प्रवास करावा लागेल. या काळात नव्या ओळखी होतील. उत्पन्नाचे नवे स्त्रोत सापडतील.

मकर: (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांना आज प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी महिला सहकारीकडून कामात सहकार्य मिळेल. काम वेळेत पूर्ण करू शकाल.

कुंभ: (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या ज्या लोकांनी नव्या योजनेवर काम सुरू केलं आहे. त्यावर फोकस करावा लागेल. परिश्रम कराल तर नशीबाची देखील साथ लाभेल. उत्पन्न वाढेल पण खर्च देखील होईल.

मीन: (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लोकांना भूतकाळात झालेल्या चुकांचा पश्चाताप होईल. काही लोकांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागेल. परंतु कोणाकडे मदत मागण्यासाठी संकोच करू नका.