Rashi Bhavishya in Marathi Today, 13 January 2022: जवळच्या सहकाऱ्याकडून फसवणूक झाल्यासारखे वाटेल... जाणून घ्या काय सांगतात तुमचे ग्रहनक्षत्र

आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल, हे जाणून घ्या पंडित जगन्नाथ गुरुजींकडून…

Published: January 13, 2022 1:00 AM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Rashi Bhavishya in Marathi Today, 13 January 2022: जवळच्या सहकाऱ्याकडून फसवणूक झाल्यासारखे वाटेल... जाणून घ्या काय सांगतात तुमचे ग्रहनक्षत्र
Rashi Bhavishya in Marathi Today, 09 January 2022

आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल, हे जाणून घ्या पंडित जगन्नाथ गुरुजींकडून…

Also Read:

मेष ( Aries Horoscope Today)

गेल्या काही दिवसांपासून घरातील खर्च वाढल्यामुळे मेष राशीच्या लोकांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. मुलांच्या शिक्षणासाठी कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागू शकते. परंतु त्यांनी योग्य सल्ल्याचे पालन केल्यास ते त्यावर मात करू शकतात.

वृषभ (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांना त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेसाठी काम करायला आवडेल. काहीजण सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतात. घाईघाईने कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करू नका. कामे बिघडण्याची शक्यता आहे.

मिथुन (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांना अनपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात परिश्रमाचे फळ मिळेल. नशीबाची साथ मिळेल. कामे यशस्वीरित्या पूर्ण कराला.

कर्क (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांना दीर्घकाळ कायदेशीर लढाईला सामोरे जावे लागत आहे. त्यांना आज सकारात्मक रिझल्ट समजेल. शहराबाहेरील धार्मिक स्थळी जाण्याच्या अचानक प्लान होईल.

सिंह (Leo Horoscope Today)

सिंह राशीचे लोक कामाच्या ठिकाणी काही अनोखे उपक्रम हाती घेतील. वरिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आंतरिक सर्जनशीलता बाहेर आणण्याचा प्रयत्न करतील. कठीण वाटणाऱ्या जबाबदाऱ्या घेण्यास मागेपुढे पाहू नका.

कन्या (Horoscope Virgo Today)

कन्या राशीच्या लोकांना आजचा दिवस खूप आनंदी जाईल. काही लोकांना मात्र, दिवसाच्या सुरुवातीला उत्साहाची कमतरता जाणवू शकते. परंतु ते प्रत्येक क्षणाचा आनंद घेवून ऊर्जा मिळवू शकतील.

तूळ (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांच्या आत्मविश्वासात वाढ होईल. प्रोजेक्ट यशस्वी होईल. तुमच्या कामाची सर्वत्र प्रशंसा होईल. कंपनीला फायदा होईल. प्रमोशन मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीचे लोक त्यांना आवडणाऱ्या गोष्टींमध्ये संपूर्ण दिवस घालवतील. काही लोक संगीत ऐकण्यात तास घालवू शकतात तर काही लोक चांगले डिश बनवू शकतात. आजूबाजूला प्रसन्न वातावरण राहील.

धनु (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांना नोकरीशी संबंधित कामात सकारात्मक परिणाम जाणवेल. काही लोकांना त्यांच्या आवडीचे पदार्थ खायलाही मिळतील. जवळच्या मित्राच्या भेटीचेही योग आहेत.

मकर ( Capricorn Horoscope Today)

मकर राशीचे लोक वडिलोपार्जित मालमत्तेबाबत घरात सुरू असलेल्या चर्चेत सहभागी होऊ शकतात. ऑफिसमध्ये काम खूप राहील. वरिष्ठ सहकार्य करतील, अशी अपेक्षा न ठेवलेलीच बरी.

कुंभ ( Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांना जवळच्या सहकाऱ्याकडून आपली फसवणूक झाल्यासारखे वाटेल. विद्यार्थी देखील विचलित होतील. परंतु त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला हवे, परीक्षा जवळ आली आहे.

मीन (Pisces Horoscope Today)

मीन राशीचे लोक आज जवळच्या व्यक्तीशी वाद घालू शकतात. आर्थिक बाबींमध्ये अस्पष्टता दिसून येईल. दिवसाच्या अखेरीस ते थोडे अस्वस्थ वाटू शकते. शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या काळजी घ्यावी लागेल.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 13, 2022 1:00 AM IST