Rashi Bhavishya in Marathi Today, 15 January 2022: प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यांसाठी आज उत्तम दिवस... जाणून घ्या आजचे राशीभविष्य

आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल, हे जाणून घ्या पंडित जगन्नाथ गुरुजींकडून…

Published: January 15, 2022 8:17 AM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Rashi Bhavishya in Marathi Today, 15 January 2022: प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यांसाठी आज उत्तम दिवस... जाणून घ्या आजचे राशीभविष्य
Rashi Bhavishya in Marathi Today, 12 January 2022

Rashi Bhavishya in Marathi Today: आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, कुंडलीतील (Kundali) ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर (Daily Horoscope) काय परिणाम होईल, हे जाणून घ्या पंडित जगन्नाथ गुरुजींकडून…(Today Rashifal)

Also Read:

मेष (Aries Horoscope)

मेष राशीचे लोक आज प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करू शकतात. नशीब साथ देईल. आत्मविश्वासही उंचावेल.

वृषभ (Taurus Horoscope)

वृषभ राशीचे लोक आज बचत करू शकतात. नव्या क्षेत्रात रस निर्माण होईल. कला-गुणांना वाव मिळेल.

मिथुन (Gemini Horoscope)

मिथुन राशीचे लोक कुटुंबातील एखाद्या सदस्यावर नाराज होऊ शकतात. आपल्या फिटनेसबाबत सजग राहा. आरोग्यविषयक चिंता सतावेल.

कर्क (Cancer Horoscope)

कर्क राशीचे लोक आज संपूर्ण दिवस जोडीदारासोबत घालवू शकतात. नोकरीत यश मिळेल. हितशत्रूकडे फारसे लक्ष न दिलेलेच बरे.

सिंह (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांना आज शुभवार्ता मिळतील. गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीची संधी मिळेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

कन्या (Virgo Horoscope)

कन्या राशीचे लोक नुकतेच भेटलेल्या कोणत्याही समविचारी व्यक्तीच्या प्रेमात पडू शकतात. ते त्यांच्या भावना व्यक्त करू शकतात.

तूळ (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांना मालमत्तेच्या बाबतीत फायदा होऊ शकतो. मोठी बचत करून उज्ज्वल भविष्यासाठी योजना करू शकतात.

वृश्चिक (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीचे लोक त्यांच्या व्यवसायासाठी आदर्श भागीदार शोधण्यास सक्षम ठरतील. नोकरदार लोक प्रलंबित राहिलेले उद्दिष्ट साध्य करू शकतात.

धनु (Sagittarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांना आर्थिक आघाडीवर बळ मिळेल. घरातील काही कार्यक्रमामुळे ते व्यस्त राहू शकतात.

मकर (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांना अनपेक्षित लोकांकडून खूप आवश्यक मदत मिळेल. त्यांनी खराब आर्थिक नियोजनापासून सावध राहावे.

कुंभ (Aquarius Horoscope)

कुंभ राशीचे लोक त्यांचे विद्यमान नातेसंबंध मजबूत करण्यावर भर देतील. त्यांच्या मनात जे असेल तेच बोलावे. वादाला कारण नको.

मीन (Pisces Horoscope)

मीन राशीचे लोक इतरांची मदत घेणे टाळतील, कारण त्यांना स्वत:च्या कृती योजनांवरून लक्ष विचलीत होऊ द्यायचे नाही आहे. ते खबरदारी घेतील.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 15, 2022 8:17 AM IST