मेष: (Aries Horoscope)

मेष राशीचे लोक आज एखाद्या सामाजिक उपक्रमात सहभाग घेतील. त्यातून मनशांतीचा अनुभव घेतील. घरातील वडिलधारी मंडळीच्या भावना समजून घ्याव्या लागतील. त्याच्या इच्छा पूर्ण करण्याचा संकल्प करू शकतात.Also Read - Daily Rashi Bhavishya in Marathi Today 6 December 2021: कुंभ राशीच्या लोकांसाठी आज 'सुरुवात' महत्त्वाची, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

वृषभ: (Taurus Horoscope)

ऑफिसमध्ये काही नवं करण्याचा तुमचा प्रयत्न पाहून इतर सहकारी तुमचा तिरस्कार करतील. परंतु त्याकडे दुर्लक्ष करा. तुम्ही तटस्थ राहा. आपलं काम प्रामाणिकपणे करत राहा, सहकाऱ्यांचं समर्थन मिळवण्यात तुम्हाला यश मिळेल. Also Read - Daily Rashi Bhavishya in Marathi Today 5 December 2021: 'या' लोकांनी अनुभवातून धडा घेण्याचा प्रयत्न करावा, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

मिथुन: (Gemini Horoscope)

मिथुन राशीचे लोकांना जोडीदाराच्या आरोग्यासंबंधी चिंतेत राहातील. अनपेक्षीत खर्च होण्याची शक्यता आहे. मात्र, चिंता करू नका. नातेवाईक मदतीसाठी सरसावतील. Also Read - Rashi Bhavishya in Marathi Today, 4 December 2021: या राशीच्या लोकांना मिळेल गलेलठ्ठ पगाराची ऑफर, जाणून घ्या आजचं राशीभविष्य

कर्क: (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांना दुपारपर्यत नोकरी किंवा व्यवसायासंबंधित सकारात्मक समाचार मिळतील. तुम्ही एखाद्या यात्रेचं नियोजन करत असाल तर ती रद्द करणेच योग्य ठरेल. अन्यथा कठीण प्रसंगाचा सामना करावा लागू शकतो.

सिंह: (Leo Horoscope)

सिंह राशीचे लोक आज कुटुंबियांना वेळ देतील. परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अथक परिश्रम घ्यावे लागतील. योग्य शिक्षकाकडून मार्गदर्शन घ्या, अपयश येणार नाही.

कन्या: (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांना आरोग्यबाबत सजग राहावं लागेल. पोटाच्या विकाराशी संबंधित आजारापासून सावधगिरी बाळगावी लागेल. त्रास जाणवल्या तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. पैशाची चिंता करू नका.

तूळ: (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांना घर आणि ऑफिसात कठीण पसंगाला सामोरे जावं लागेल. त्यातून बाहेर निघण्यासाठी वडिलांकडून मदत घ्यावी लागेल.

वृश्चिक: (Scorpio Horoscope)

वडिलोपार्जित संपत्ताचा उत्तराधिकारी म्हणून घोषित झाल्यचा आनंद अनुभवाल. मात्र, वास्तविकतेचं भान ठेवावं लागेल. आयतं मिळालेलं जास्त दिवस टिकत नाही.

धनु: (Sagittarius Horoscope)

धनु राशीचे लोक लवकरच घरी एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन कराल. त्यात नातेवाईक आणि जवळचे मित्र सहभागी होतील. व्यवसायात लाभ मिळेल.

मकर: (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांना कौटुंबिक समस्येचा सामना करावा लागू शकतो. जोडीदाराला पुरेसा वेळ देता येणार नाही. विवाह इच्छूक मुला-मुलींचे व्यवसाय जुळतील.

कुंभ: (Aquarius Horoscope)

कुंभ राशीचे लोक आज आपल्या कुटुंबीयांसोबत खरेदीसाठी घराबाहेर पडतील. आई-वडिलांसोहत मालमत्तेत गुंतवणुकीवरून वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मीन: (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लोकांनी आता नुकताच व्यवसाय सुरू केला आहे, त्यांना अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. त्यांनी पैशांचा चांगल्या प्रकारे विनियोग करावा. अन्यथा शेवटी त्यांच्याकडे काहीच उरणार नाही.